Akshaya Deodhar-Hardik Joshi : लग्नानंतर पाठकबाई आणि राणादाची स्वारी निघाली देवदर्शनाला, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:52 IST2022-12-10T15:51:32+5:302022-12-10T15:52:12+5:30
Akshaya Deodhar-Hardik Joshi : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा शाही लग्नसोहळा २ डिसेंबर रोजी पुण्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Akshaya Deodhar-Hardik Joshi : लग्नानंतर पाठकबाई आणि राणादाची स्वारी निघाली देवदर्शनाला, फोटो व्हायरल
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचं २ डिसेंबरला पुण्यात लग्न पार पडले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता लग्नानंतर अक्षया आणि हार्दिकचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये ते दोघे देव दर्शनाला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
लग्नानंतर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर देव दर्शनासाठी निघाले आहेत. दोघे वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. तिथले त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत अक्षयाने लिहिले, 'अहा'. चाहत्यांनी देखील त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या दोघांनी सप्तपदी घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये अक्षया आणि हार्दिकने एकत्र काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत हार्दिकने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आता चाहते पुन्हा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.