"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 13:21 IST2024-09-08T13:16:47+5:302024-09-08T13:21:23+5:30

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षयाने बाप्पाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

akshaya deodhar and hardik joshi celebrated ganpati festival shared special post | "प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..."

"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..."

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्याने वातावरण प्रफुल्लित झालं आहे. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही सेलिब्रिटींनी त्यांच्या लाडक्या बाप्पाचं घरी जल्लोषात आगमन केलं आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षयाने बाप्पाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. 

अक्षया देवधरची पोस्ट 

तुझे ठायी माझी भक्ति

विरुठावी गणपती✨

तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती💕

प्रिय बाप्पा...हार्दिक आयुष्यात आल्यापासून तुझ्या येण्याचा आनंद द्विगुणित झालाय असं वाटतं...कदाचित या शब्दांप्रमाणे तुझ्या ठाई त्याची आणि माझी भक्ती जुळून आली आणि आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो...🥰

तुझी कृपादृष्टी, प्रेम, माया, अशीच राहू दे. आम्हा सर्वांवर...ज्योतीची काळजी घे...आम्ही नायशाची काळजी घेतोय हे तीलाही सांग.

आता ५ दिवस छान राहा...आमच्याकडुन खुप सेवा करुन घे.🙏🏻

तुझी लाडकी अक्षया.✨


अक्षया आणि हार्दिकने तुझ्यात जीव रंगला मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेतील त्यांनी राणादा आणि पाठकबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक घराघरात पोहोचले. त्यांनी डिसेंबर २०२२मध्ये खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: akshaya deodhar and hardik joshi celebrated ganpati festival shared special post