लगीन घटिका समीप आली! पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:16 IST2022-11-28T17:09:56+5:302022-11-28T17:16:24+5:30
Akshaya Deodhar : पाठकबाई राणादासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

लगीन घटिका समीप आली! पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले फोटो
Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar ) एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. तर लगीनघाई सुरू झाली आहे.
हार्दिक व अक्षया दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण कधी? याचा खुलासा होत नव्हता. लग्नाच्या तारखेबद्दल या जोडप्यानं कमालीची गुप्तता पाळली आहे. पण आता तोही खुलासा झाला आहे. काल हार्दिकने घरच्या केळवणाचा फोटो शेअर केला होता. हार्दिक पाठोपाठ अक्षयाचे ही केवळण व ग्रहमक पार पडलं आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टास्टोरीवर फोटो पोस्ट केलं आहेत. चॉकलेटी रंगाच्या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसतेय. अक्षयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हार्दिक व अक्षया दोघंही पुण्यात लग्नगाठ बांधणार असल्याचं मानलं जात आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे दोघे ज्या ठिकाणी विवाहबद्ध झाले, तिथेच हार्दिक आणि अक्षया लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.