​पिया अलबेलासाठी अक्षय म्हात्रे आणि शीन दासने गंगेत मारली डुबकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 17:03 IST2017-03-02T11:33:12+5:302017-03-02T17:03:12+5:30

मालिकांच्या चित्रीकरणासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यांना दिवसातील कित्येक तास मालिकेच्या चित्रीकरणासाठी द्यावे लागतात. पिया अलबेला या मालिकेचे ...

Akshay Mhatre and Sheen Das danced in the Ganga for Piya Albel | ​पिया अलबेलासाठी अक्षय म्हात्रे आणि शीन दासने गंगेत मारली डुबकी

​पिया अलबेलासाठी अक्षय म्हात्रे आणि शीन दासने गंगेत मारली डुबकी

लिकांच्या चित्रीकरणासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यांना दिवसातील कित्येक तास मालिकेच्या चित्रीकरणासाठी द्यावे लागतात. पिया अलबेला या मालिकेचे चित्रीकरण सध्या हृषिकेश येथे सुरू आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय म्हात्रे आणि शीना दास यांना पहाटे चार वाजता गंगेत स्नान करावे लागले. गंगेचे पाणी प्रचंड थंड असल्याने या दोघांना चित्रीकरणाच्यावेळी प्रचंड थंडी वाजत होती. एवढेच नव्हे तर या सीनसाठी अनेक शॉर्ट देणे गरजेचे असल्याने त्यांना अनेकवेळा गंगेत उडी मारावी लागली. त्यावेळी तिथले तापमान केवळ 10 डिग्री होते. त्यामुळे त्यांना अक्षरशः हुडहुडी भरत होती. एवढेच नव्हे तर चित्रीकरण करताना पाण्यात असलेले दगड, पाण्यातील काही वस्तू याच्यामुळे त्यांना काही जखमादेखील झाल्या आहेत. यामुळे त्या दोघांनाही इंजेक्शनदेखील घ्यावे लागले आहे. या चित्रीकरणाविषयी अक्षय आणि शीन सांगतात, "पहाटे चार वाजता खूपच थंडी होती. त्या थंडीत गंगेत स्नान करण्याचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो. सुरुवातीला पाण्यात जाण्यासाठी आम्ही दोघांनी 10 मिनिटे घेतली. खरे तर आमच्या दोघांना सरळ पाण्यात ढकलून देण्याचा किएटिव्ह टीमचा विचार होता. पण कसातरी धीर करून आम्ही दोघेही पाण्यात गेलो. पण या सीनसाठी अनेक शॉर्ट देणे गरजेचे असल्याने आम्ही प्रत्येक शॉर्टला कपडे बदलत होतो आणि आमची टीम आमचे कपडे सुकवून पुढच्या सीनसाठी आम्हाला पुन्हा ते देत होती. हा सीन करायला जवळजवळ सहा तास लागले. आमची संपूर्ण टीम या चित्रीकरणासाठी सुके कपडे, गरम चहा, टॉवेल, ड्रायर सगळे काही घेऊन तयार होते. आमच्या टीमने आमची काळजी घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत." 



Web Title: Akshay Mhatre and Sheen Das danced in the Ganga for Piya Albel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.