'अक्षरा बहू’ म्हणजेच हिना खान आता साकारणार ही भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 11:24 IST2017-09-16T05:53:31+5:302017-09-16T11:24:35+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि संस्कारी बहू लवकरच वेगळ्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. आजवर कुणीही पाहिला नसेल असा तिचा अंदाज ...

'Akshara Bahu' means Hina Khan will be the real role to play! | 'अक्षरा बहू’ म्हणजेच हिना खान आता साकारणार ही भूमिका!

'अक्षरा बहू’ म्हणजेच हिना खान आता साकारणार ही भूमिका!

ट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि संस्कारी बहू लवकरच वेगळ्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. आजवर कुणीही पाहिला नसेल असा तिचा अंदाज रसिकांना पाहायला मिळेल. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री म्हणजे हिना खान. हिना लवकरच एका आगामी मालिकेत वेश्येची म्हणजेच तवायफची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. रश्मी शर्मा यांच्या आगामी मालिकेतून हिना खान कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेश्या या भूमिकेसाठी हिना खान हिच्याकडे विचारणा झाल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 'शक्ती एक अस्तित्व की कहानी', 'देश की बेटी नंदिनी' अशा मालिकांमुळे रश्मी शर्मा प्रॉडक्शन हाऊस प्रसिद्ध आहे. आता हे प्रॉडक्शन हाऊस आता वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्या जीवनाची कहानी मालिका रुपात रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. याआधी हिनाला बेलन बहू या मालिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र त्याऐवजी खतरों के खिलाडी या शोमध्ये सामील होण्यास तिने प्राधान्य दिलं. हिनानं नकार दिल्यानंतर बेलन बहू या मालिकेत क्रिस्टल डिसुझा हिची एंट्री झाली. ये रिश्ता क्या कहेलाता है या मालिकेतून हिनाने आठ वर्ष काम केल्यानंतर एक्झिट घेतली होती. त्यानंतर हिनाचं छोट्या पडद्यावर फारसं दर्शन झालं नाही. बिग बॉस या रियालिटी शोच्या दहाव्या सीझनमध्ये रसिकांना काही काळासाठी तिचं दर्शन घडलं. बिग बॉस-10मध्ये स्पर्धक असलेला रोहन मेहरा याला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिना बिग बॉसच्या घरात आली होती. रोहननं छोट्या पडद्यावर तिच्या लेकाची भूमिका साकारली होती. संस्कारी बहू म्हणून हिना खान हिला रसिकांचं भरभरुन प्रेम मिळालं. आता तवायफ म्हणजेच वेश्याच्या नव्या अवतारात रसिक तिला स्वीकारणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Also Read: हिनाचा वर्कआऊटवेळ सेल्फी टाईम

 
हिना खान सध्या 'खतरों के खिलाडी पर्व 8'मध्ये झळकत आहे. खतरनाक स्टंट करताना लग जा गले हे गाणे गात असल्याचा तिचा हा अंदाज रसिकांनाही आवडतोय.या शोमध्ये स्टंट करताना  हिना या शोचा होस्ट रोहित शेट्टीचे फेव्हरेट गाणे गात दिलेला टास्क पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळाले.या शोच्या माध्यमातून हिना खान तिच्या ख-या आयुष्यात कशी असते हेही रसिकांना जाणून घेता येते तसेच हिनाला गाण्याची आवड असल्याचेही या शोच्यामाध्यमातून रसिकांना कळलंय. त्यामुळे सगळ्या कंटेस्टंटपेक्षा हिनाला रसिकांची जास्त पसंती मिळत आहे.

Web Title: 'Akshara Bahu' means Hina Khan will be the real role to play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.