Video: हा काय वेडेपणा? पैठणीची वाट लावली; 'बिग बॉस' फेम आकांक्षा पुरी ट्रोल, चाहत्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:18 IST2026-04-05T17:17:56+5:302026-04-05T17:18:27+5:30

आकांक्षाची फॅशन पैठणी साडीतील फॅशन चाहत्यांना पटलेली नाही. फॅशन शोमधली तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

akanksha puri gets troll for wearing bikini blosue on paithani video viral | Video: हा काय वेडेपणा? पैठणीची वाट लावली; 'बिग बॉस' फेम आकांक्षा पुरी ट्रोल, चाहत्यांचा संताप

Video: हा काय वेडेपणा? पैठणीची वाट लावली; 'बिग बॉस' फेम आकांक्षा पुरी ट्रोल, चाहत्यांचा संताप

बिग बॉस मधून प्रसिद्धीझोतात आलेली आकांक्षा पुरी कायमच चर्चेत असते. बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे अनेकदा तिला ट्रोलही केलं जात. आतादेखील आकांक्षाने फॅशन शोसाठी केलेल्या लूकमध्ये नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आकांक्षाची फॅशन पैठणी साडीतील फॅशन चाहत्यांना पटलेली नाही. फॅशन शोमधली तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आकांक्षा पुरीने फॅशन शोसाठी हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. मात्र तिने पैठणीत केलेला लूक चाहत्यांना आवडेला नाही. फॅन्सी आणि बोल्ड दिसण्यासाठी आकांक्षाने पैठणी साडीवर हॉट बिकिनी ब्लाऊज घातला होता. केसांचा बन बांधून तिने गजरा माळला. तर कानात मोठे झुमके आणि गळ्यात खड्यांचा हार घातल्याचं दिसलं. मात्र तिचा रिव्हिलिंग ब्लाऊज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. "साडीची वाट लावली", "पारंपरिक ब्लाऊज घातला असता तर चांगली दिसली असती", "बकवास", "साडीची ऐशी तैशी केली", "हिने साडीचा अपमान केला', अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


आकांक्षा पुरी ही हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे. विघ्नहर्ता गणेश, या देवी दुर्गामनाशिनी या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. याशिवाय तमिळ, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. बिग बॉसमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. काही वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. 

Web Title : पैठणी साड़ी लुक के लिए आकांक्षा पुरी हुईं ट्रोल; फैंस ने दिखाई नाराजगी।

Web Summary : आकांक्षा पुरी को पैठणी साड़ी में फैशन शो लुक के लिए आलोचना का सामना करना पड़ा। बिकिनी ब्लाउज के चुनाव से दर्शक नाराज थे, उन्होंने पारंपरिक पोशाक का अपमान करने के लिए उसकी आलोचना की। टिप्पणियों में लुक को 'बकवास' और 'साड़ी का अपमान' कहा गया।

Web Title : Akanksha Puri trolled for Paithani saree look; fans express anger.

Web Summary : Akanksha Puri faced backlash for her fashion show look in a Paithani saree. Her choice of a revealing bikini blouse angered viewers, who criticized her for disrespecting the traditional attire. Comments included calling the look 'bakwas' and an 'insult to the saree'.