सूरज चव्हाणच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची कमेंट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:26 IST2025-11-18T18:26:30+5:302025-11-18T18:26:48+5:30
सूरजच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवार यांनी कमेंट केली.

सूरज चव्हाणच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची कमेंट, म्हणाले...
'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि रिल स्टार सूरज चव्हाण सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. एका बाजूला २९ नोव्हेंबर रोजी तो संजना गोफणेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज त्याने त्याच्या नवीन आलिशान घरात गृहप्रवेश केला आहे. या दुहेरी आनंदामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक कमेंट खूपच खास ठरली आहे. ती म्हणजे थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करत अजित पवार यांनी सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज चव्हाणने त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ नुकताच त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याचे संपुर्ण घर पाहायला मिळतंय. सूरज चव्हाणचं नवं घर एखाद्या आलीशान महालापेक्षा कमी नाही. सर्व अद्ययावत सुख-सुविधांनी सज्ज असे आहे. सूरजच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवार यांनी कमेंट केली. सूरजला शुभेच्छा देत त्यांनी लिहलं, "सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!".
अजित पवारांनी शब्द पाळला
'बिग बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी सूरजने एक स्वप्न पाहिलं होतं. आपलं हक्काचं घर असावं, असं त्याचं स्वप्न होतं. 'बिग बॉस'च्या घरातही सूरजने आपल्या गावात हक्काचं घर बांधण्याची इच्छा बोलून दाखवली होती. 'बिग बॉस' जिंकल्यानंतर अजित पवार यांनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी सूरजला घर बांधून देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी तात्काळ सूरजच्या घराचं काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे सूरज चव्हाणचं खूप मोठं स्वप्न आता सत्यात उतरलंय.

सूरजचं लग्न कधी?
सूरज चव्हाण लवकरच त्याची चुलतमामांची मुलगी संजना गोफणे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. २९ नोव्हेंबरला सासवड-जेजुरी रोड येथे त्यांचा साखरपुडा, हळदी समारंभ आणि विवाहसोहळा एकाच दिवशी पार पडणार आहे. लग्नाआधी नव्या घरात प्रवेश करता आला म्हणून सुरज खूपच खुश असलेला पाहायला मिळतोय.