TMKOC : ऐश्वर्या सखुजा 'दयाबेन' होण्यामागे किती तथ्य? म्हणाली - ऑडिशन दिली होती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:45 IST2022-07-11T17:44:06+5:302022-07-11T17:45:16+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ही आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ऐश्वर्याच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. आता खुद्द ऐश्वर्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Aishwarya sakhuja confirms audition for dayaben in taarak mehta but not doing show | TMKOC : ऐश्वर्या सखुजा 'दयाबेन' होण्यामागे किती तथ्य? म्हणाली - ऑडिशन दिली होती पण...

TMKOC : ऐश्वर्या सखुजा 'दयाबेन' होण्यामागे किती तथ्य? म्हणाली - ऑडिशन दिली होती पण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांची. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात होतं.  बऱ्याच काळापासून चाहते नव्या 'दयाबेन'ची वाट पाहात आहेत. 'दयाबेन' हे पात्र अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) हिने घराघरांत पोहोचवलं. पण दिशानं मालिकेतून एग्झिट घेऊन आता चार वर्ष झाली आहेत. तरीही चाहते आजही दयाबेनचा अनोखा गरबा आणि आवाजाची आठवण काढत आहेत.

काही दिवसांपूर्वी 'ये है चाहतीं' फेम ऐश्वर्या सखुजा(Aishwarya Sakhuja)  हिने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि तिचे काम निर्मात्यांनी पसंत केले होते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ही आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ऐश्वर्याच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. आता खुद्द ऐश्वर्याने या रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण दिले आहे. 
 

काय म्हणाली ऐश्वर्या?
पिंकविलाशी बोलताना ऐश्वर्याने कन्फर्म केले की तिने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'साठी ऑडिशन दिले होते. पण त्याचवेळी तिने शोमध्ये येत नसल्याचेही सांगितले. तिने सांगितले की, "मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती पण मला वाटत नाही की मी हा शो करणार आहे."

उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दयाबेन, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या  आहेत. 
 

Web Title: Aishwarya sakhuja confirms audition for dayaben in taarak mehta but not doing show