"मी रिव्हिलींग काहीच केलेलं नाही...", साडीतील बोल्ड लूकवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:53 IST2026-02-02T13:52:45+5:302026-02-02T13:53:18+5:30

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं कसं होतं हे फोटोशूट

aishwarya narkar talks about her bold photoshoot in saree says there is nothing revealing | "मी रिव्हिलींग काहीच केलेलं नाही...", साडीतील बोल्ड लूकवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं स्पष्टीकरण

"मी रिव्हिलींग काहीच केलेलं नाही...", साडीतील बोल्ड लूकवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं स्पष्टीकरण

ऐश्वर्या नारकर या मराठीतील सर्वात जुन्या आणि एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. त्यांची शेवटची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका चांगलीच गाजली. ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतील लूकची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. त्यांचं साड्यांचं कलेक्शन, साडीप्रेम चाहत्यांना दिसून येतं. काही फोटोंमध्ये त्या अगदीच बोल्ड लूकमध्ये दिसल्याच्याही कमेंट्स आल्या आहेत. आता त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर दिलं आहे.

अमोल परचुरेंच्या 'कॅचअप'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "बोल्ड लूकचं म्हणायचं तर मी कधीच रिव्हिलींग असं काही केलेलं नाही. लोकांना साडीतली ती पोज बोल्ड वाटते. खरं तर त्यात काहीच दिसत नसतं. कुठूनच काहीत दिसत नसतं. आशय तुलालवार माझं फोटोशूट करतो आणि तो मला अगदी मित्र, भावासारखा आहे. मला त्याच्यासमोर नेहमीच कंफर्टेबल वाटतं. तो एकदम करेक्टट क्लिक करतो. शूट करताना मला अजिबात काहीच दडपण वाटत नाही. तसंच त्या फोटोंमध्ये काहीतरी एक गंमत असते. पदर व्यवस्थित घेऊन पूर्ण साडीत काढलेले ते फोटो असतात पण त्या नजरेते, एक्सप्रेशन मध्ये काहीतरी जाणवतं. मला त्याच्याबरोबर ते फोटोशूट करताना नेहमीच मजा येते."

मालिका संपल्यानंतर ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांनी स्वत:चा साड्यांचा बिझनेसही सुरु केला. सध्या ऐश्वर्या आणि अविनाश नारकर 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकातून रंगभूमी गाजवत आहेत. कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कित्येक वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर एकत्र आल्याने त्यांच्या केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या एव्हरग्रीन कपलला अनेकदा त्यांच्या रील्सवरुन ट्रोलही करण्यात येतं. मात्र ऐश्वर्या यांनी कायमच ट्रोलर्सला सडेतोड उत्तरं दिली आहेत.

Web Title : ऐश्वर्या नारकर ने बोल्ड साड़ी लुक पर दी सफाई: 'कुछ भी रिवीलिंग नहीं'

Web Summary : ऐश्वर्या नारकर ने अपनी बोल्ड साड़ी लुक पर टिप्पणियों का जवाब देते हुए कहा कि उन्होंने कुछ भी रिवीलिंग नहीं किया है। वह फोटोग्राफर आशय तुलालवार के साथ सहज महसूस करती हैं, जो उन्हें अच्छी तरह से कैप्चर करते हैं। नारकर और उनके पति वर्तमान में नाटक 'शेवग्याच्या शेंगा' में प्रदर्शन कर रहे हैं।

Web Title : Aishwarya Narkar clarifies bold saree look comments: 'Nothing revealing'

Web Summary : Aishwarya Narkar addressed comments about her bold saree looks, stating she hasn't done anything revealing. She feels comfortable with photographer Ashay Tulalwar, who captures her well. Narkar and her husband are currently performing in the play 'Shevgyachya Shenga'.