लय भारी ! ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:28 IST2023-08-31T17:22:00+5:302023-08-31T17:28:45+5:30

ऐश्वर्या-अविनाश या जोडीकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत

Aishwarya narkar avinash narkar dance video viral | लय भारी ! ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

लय भारी ! ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. ऐश्वर्या-अविनाश या जोडीकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ऐन साठीतही ऐश्वर्या आणि अविनाश त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ऐश्वर्या कित्येकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. तर अविनाश नारकर यांचे अनेक रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांच्याबरोबर रील बनवला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या रीलमधील दोघांची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. यात दोघेही ट्रे़डिशनल लूकमध्ये  धमाल डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून  नेटकऱ्यांनाही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.''सर्व कलाकार आहेत तुमच्या घरात तुमचं आडनाव नारकर नाही तbeszyर नृत्यकर असायला पाहिजे होत. '' अशी कमेंट एका नेटकऱ्याने त्यांचा डान्स पाहून केली आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडेने कमेंट करत ''कमाल''  असं म्हटलं आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर  नारकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या सध्या  झी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 

Web Title: Aishwarya narkar avinash narkar dance video viral