ऐश्वर्याला लोकांना हसवायचेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:11 IST2016-07-01T09:41:01+5:302016-07-01T15:11:01+5:30
सास बिना ससुराल या मालिकेतील ऐश्वर्या सखुजाने साकारलेली टोस्टी ही भूमिका प्रचंड गाजली होती. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या खिडकी ...

ऐश्वर्याला लोकांना हसवायचेय
स स बिना ससुराल या मालिकेतील ऐश्वर्या सखुजाने साकारलेली टोस्टी ही भूमिका प्रचंड गाजली होती. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या खिडकी या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेतील ऐश्वर्याची भूमिका ही छोटी असली तरी या मालिकेची पटकथा आवडल्याने ही मालिका स्वीकारली असल्याचे ती सांगते. खिडकीमध्ये विविध कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ऐश्वर्या अंजू की शादी या पहिल्या कथेत झळकणार असून पुढील काही कथांमध्येही ती काम करणार आहे. ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये गंभीर भूमिका साकारल्या आहेत. पण तिला आता एखाद्या कॉमेडी मालिकेत झळकायचे आहे. प्रेक्षकांना मला खळखळून हसवायचे आहे असे ती सांगते.