अहा...! पाठकबाईंना राणादानं दिलं महागडं गिफ्ट, अक्षया देवधर म्हणाली - "सकाळी उठले तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 11:46 IST2023-10-19T11:45:47+5:302023-10-19T11:46:05+5:30
Akshaya Deodhar-Hardik Joshi : नुकतीच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. हार्दिकने अक्षयाला मोठं गिफ्ट दिले आहे.

अहा...! पाठकबाईंना राणादानं दिलं महागडं गिफ्ट, अक्षया देवधर म्हणाली - "सकाळी उठले तेव्हा..."
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई आणि राणादाच्या भूमिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहचले. या मालिकेतून त्या दोघांनी तुफान लोकप्रियता मिळवली आहे. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असतात आणि चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान आता नुकतीच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. हार्दिकने अक्षयाला मोठं गिफ्ट दिले आहे.
अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोसोबत लिहिले की, उठले तेव्हा शेजारी आयफोन १५ प्रो मॅक्स. थँक्यू हार्दिक जोशी.हार्दिकने अक्षयाला महागडा अॅपलचा फोन दिला आहे. नॅचरल टायटेनियमचा १ टीबीचा हा फोन आहे. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
डिसेंबर २०२२मध्ये अक्षया आणि हार्दिकने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा रंगली होती. पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, हार्दिक लवकरच वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.