​गोठ मालिकेत दाखवला जाणार अग्निफेरा आणि शिमगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 11:35 IST2017-03-11T06:05:35+5:302017-03-11T11:35:35+5:30

शिमगोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, पुण्यांसारख्या शहरात राहाणारी मंडळीदेखील शिमण्याला आवर्जून कोकणातील आपल्या घरी परततात. भारतातील ...

Agni Aphera and Shimga will be shown in the frozen rug | ​गोठ मालिकेत दाखवला जाणार अग्निफेरा आणि शिमगा

​गोठ मालिकेत दाखवला जाणार अग्निफेरा आणि शिमगा

मगोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, पुण्यांसारख्या शहरात राहाणारी मंडळीदेखील शिमण्याला आवर्जून कोकणातील आपल्या घरी परततात. भारतातील विविध भागातील लोक हा शिमगा पाहाण्यासाठी आवर्जून कोकणात जातात. स्टार प्रवाहवरील ‘गोठ’ या मालिकेची कथा ही कोकणच्या पार्श्वभूमीवर घडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातला पाच दिवसांचा शिमगोत्सव या मालिकेत दाखवला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अग्निफेरा कोणत्याही मराठी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बयोआजी राधा विरुद्ध नेहमीच काही ना काही तरी षडयंत्र रचत असते. राधाचा तिरस्कार करणाऱ्या बयो आजीने तिच्या लग्नात विघ्न आणण्याचादेखील प्रयत्न केला होता. त्यामुळे ती आता राधा विरुद्ध काय षडयंत्र रचते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मालिकेसाठी अग्निफेरा चित्रित करणे मालिकेच्या टीमसाठी सोपे नव्हते. हा अग्निफेरा चित्रित करताना मालिकेच्या टीमला मोठी जोखीम पत्करावी लागली. प्रत्यक्ष आग, त्यातून मार्ग काढण्यासाठी फाईट मास्टर अशी जय्यत तयारी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी करण्यात आली होती. यासाठी या मालिकेतील कलाकारांनीदेखील विशेष तयारी केली होती. तसेच व्हीएफएक्स तंत्रज्ञाच्या मोठ्या टीमने जवळपास तीन दिवस अहोरात्र शूट करून हे अग्निफेऱ्याचे नाट्य जिवंत केले. 
म्हापसेकर घराण्यातल्या बयोआजी आणि राधा यांच्यातला संघर्ष या अग्निफेऱ्यात एक निर्णायक वळण घेणार आहे. त्यामुळे हा प्रसंग तितक्याच ताकदीने सादर करण्यात आला.
गोठ या मालिकेत नीलकांती पाटेकर, राजन भिसे, समीर परांजपे, रुपल नंद, सुशील इनामदार, विवेक गोरे, ऋता काळे, सुप्रिया विनोद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोठ या मालिकेला आता काय वळण मिळते हे लवकरच कळेल. 


Web Title: Agni Aphera and Shimga will be shown in the frozen rug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.