'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतील शुभ्रा फेम अभिनेत्री उमा पेंढारकर दिसणार नव्या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:23 IST2022-05-23T18:22:27+5:302022-05-23T18:23:02+5:30
Uma Pendharkar: अभिनेत्री उमा पेंढारकर छोट्या पडद्यावर बराच काळानंतर कमबॅक करते आहे.

'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतील शुभ्रा फेम अभिनेत्री उमा पेंढारकर दिसणार नव्या मालिकेत
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सूनबाई'(Aggabai Sunbai)ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहे. या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma pendharkar) हिने साकारली होती. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आता उमा नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे योगयोगेश्वर जय शंकर(Yogyogeshwar Jai Shankar).
कलर्स मराठीवर ३० मेपासून शिरीष लाटकर लिखित योगयोगेश्वर जय शंकर ही नवीन मालिका सुरू होत आहे. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे. मालिकेमध्ये शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका आपल्या सगळ्यांची लाडकी उमा पेंढारकर साकारणार आहे. उमाने याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची साकारली होती. तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आणि आता ती पुन्हाएकदा योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका वठवणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत. आणि बाल शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर साकारणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना उमा म्हणाली, कलर्स मराठीवर स्वामिनी मालिकेत पार्वतीबाई पेशवा हे पात्र साकारल्यावर आता प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे पुन्हाएकदा पार्वतीबाई म्हणून मी आपल्या भेटीस येते आहे. दोन्ही पार्वतीबाई मधील एक समान धागा म्हणजे त्यांच्यातील मातृत्वाचे भाव, देवावर अपार श्रध्दा. महाराजांची आई साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या पात्राविषयी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मालिकेतून महाराजांचा विचार, त्यांचं कार्य, पोहचविण्याची संधी मला मिळाली हा त्यांचा एक मोठा आशीर्वाद असे मी मानते. म्हणूनच अतिशय मनापासून आणि जबाबदारीने या भूमिकेसाठी मी सज्ज झाली आहे.