'अग्गंबाई सूनबाई' फेम गिरीश ओक दिसणार या मालिकेत, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:20 PM2021-10-04T16:20:46+5:302021-10-04T16:21:17+5:30

अभिनेते गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

'Aggabai Sunbai' fame Girish Oak will appear in this series, find out about it | 'अग्गंबाई सूनबाई' फेम गिरीश ओक दिसणार या मालिकेत, जाणून घ्या याबद्दल

'अग्गंबाई सूनबाई' फेम गिरीश ओक दिसणार या मालिकेत, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत लवकरच परमेश्वर स्वरुप स्वामीजी यांची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक स्वामीजी यांची भूमिका साकारणार असून पहिल्यांदाच ते अशा पद्धतीची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना गिरीश ओक म्हणाले, मी याआधी अशा पद्धतीचं पात्र रंगवलेले नाही त्यामुळेच करताना मजा येतेय. मला वरकरणी जे दिसत नाहीत पण प्रत्यक्षात वेगळे असतात अशी पात्र साकारायला आवडतात. याआधी मी बरीच सात्वीक पात्र साकारली आहेत. त्यामुळे फुलाला सुगंध मातीचा मालिकेत स्वामीजी साकारणे माझ्यासाठी नवे आव्हान असणार आहे. कोणतेही पात्र साकारताना त्याची लकब ही प्रेक्षकांच्या मनात कायम रहाते आणि त्याला लोकप्रियता मिळते. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल अशी आशा आहे. मी दिग्गज अभिनेते प्राण यांचा चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची प्रेक्षकांवर छाप सोडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो.


स्वामीजींच्या येण्याने कीर्तीसमोर मात्र नवे संकट उभे ठाकणार आहे. आता या संकटाचा सामना ती कशी करते हे पहाण्यासाठी फुलाला सुगंध मातीचा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.पहा.

Web Title: 'Aggabai Sunbai' fame Girish Oak will appear in this series, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.