जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा...; बबड्याचा नवा लुक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:00 IST2021-06-09T08:00:00+5:302021-06-09T08:00:02+5:30

प्रेक्षकांचा लाडका बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण काय तर त्याचा नवा लुक.

agga bai sasubai babdya aka soham ashutosh patki new look | जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा...; बबड्याचा नवा लुक पाहिलात का?

जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा...; बबड्याचा नवा लुक पाहिलात का?

ठळक मुद्देआशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते.

अग्गंबाई सासूबाई’ (Agga Bai Sasubai ) या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेतील बबड्या ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत ही व्यक्तिरेखा आशुतोष पत्कीने साकारली होती. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका संपल्यानंतर आता बबड्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. प्रेक्षकांचा लाडका बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की (Ashutosh Patki) ही मालिका संपल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण काय तर त्याचा नवा लुक.

होय, आशुतोषने त्याच्या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘जेव्हा स्वत:चे केस कापण्याचा प्रयत्न फसतो,’ असे लिहित बबड्याने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. साहजिकच चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. भाई कडक़, भारी दिसतोय, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याने वन्स मोअर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. अभिनय हे आशुतोषचे पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अ‍ॅकेडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत.  मेंदीच्या पानावर आणि  दुर्वा  या मालिकेत त्याने काम केले. पण त्याला ख-या अर्थाने लोकप्रियता ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे मिळाली. 
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने लाडाने वाया गेलेला आणि आईची अजिबात काळजी नसलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. नकारात्मक छटा असलेल्या या भूमिकेने आशुतोषला अपार लोकप्रियता दिली. तेवढाच तिरस्कारही त्याच्या वाटयाला आला.

अलीकडे एका मुलाखतीत खुद्द आशुतोषने याबद्दल सांगितले होते. मालिकेतील बबड्या या व्यक्तिरेखेमुळे मला खूप लोक ओळखू लागलेत. पण मी ख-या आयुष्यातदेखील बबड्यासारखा बिघडलेला, आईची काळजी न घेणारा आहे, असा लोकांचा समज झाला होता. या मालिकेमुळे मला असे खूप विचित्र अनुभव आलेत. अगदी माझ्या शेजारी राहणाºया लोकांचे माझ्यासोबतचे वागणे बदलले होते,असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

Web Title: agga bai sasubai babdya aka soham ashutosh patki new look