वृद्ध महिलेचा Video व्हायरल, 'सपने सुहाने लडकपन के' मालिकेतील लेकीने वाऱ्यावर सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 14:42 IST2023-07-02T14:41:44+5:302023-07-02T14:42:21+5:30
एका युट्यूब चॅनलवर या वृद्ध महिलेचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.

वृद्ध महिलेचा Video व्हायरल, 'सपने सुहाने लडकपन के' मालिकेतील लेकीने वाऱ्यावर सोडलं
बिहारमधील पटना जिल्ह्यातील काली घाटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जेव्हा या महिलेबाबत चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'सपने सुहाने लडकपन के' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्रीची ती आई असल्याचं उघड झालं आहे. मग ती तिथे अशा अवस्थेत का आहे असा प्रश्न आहे.
एका युट्यूब चॅनलवर या वृद्ध महिलेचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. यामध्ये एक मुलगा त्या महिलेला प्रश्न विचारतो. त्यावर ती सांगते,'झालं नाव पूर्णिमा देवी आहे. मी दार्जिलिंगमध्ये राहते. माझी मुलं माझी काळजी घेत नाहीत. ते मला विसरले आहेत. मला प्रश्न नका विचारु.' मात्र व्हिडिओ पुढे असं काही होतं जे धक्कादायक आहे.
महिलेला जेव्हा तिच्या मुलांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती रडतच म्हणाली,'माझी मुलगी सपने सुहाने लडकपन मालिकेत काम करत होती. ती मुंबईत असते. मला या विषयावर काही बोलायचं नाही मला प्रश्न विचारु नका. मला काली घाटावर त्यांनी सोडून दिलं.' अद्याप महिलेच्या दार्जिलिंगमधील पत्त्याविषयी माहिती मिळालेली नाही. सध्या महिलेला जास्त प्रश्न विचारले तर ती फक्त रडत आहे.
दरम्यान व्हिडिओतून तिच्या अभिनेत्री असलेल्या मुलीविषयी काहीही कळलेलं नाही. ११ वर्षांपूर्वी तिने या मालिकेत भूमिका साकारली होती. मालिकेत रुपल त्यागी आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत होते. नेटकरी महिलेच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.