Akshaya-Hardik Photo: राणादा आणि पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी व्हायरल, फोटोत दिसतेय बॉन्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:52 IST2022-12-03T16:07:41+5:302022-12-03T16:52:30+5:30
फोटोत हार्दिक आणि अक्षया दोघेही पारंपारिक लूकमध्ये दिसतायेत.

Akshaya-Hardik Photo: राणादा आणि पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी व्हायरल, फोटोत दिसतेय बॉन्डिंग
राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर काल (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा झाली. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. पुण्यात पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या लग्न सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दोघांच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
या लग्नसोहळ्याला त्या दोघांच्या नातेवाईक परिवारासोबत मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारदेखील उपस्थित होते. आता लग्नानंतर अक्षया आणि हार्दिकचा पहिला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवधूच्या रुपात पाठकबाई खूपच सुंदर दिसत आहेत.
फोटोत हार्दिक आणि अक्षया दोघेही पारंपारिक लूकमध्ये दिसतायेत. अक्षयानं हिरव्या रंगाची साडी, नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र अशा मराठमोळ्या लूकमध्ये आहे तर हार्दिकनं कुर्ता घातला आहे. लग्नानंतर दोघांचा पहिला सेल्फी चाहत्यांना खूपच आवडला आहे.