लग्नाच्या दहा वर्षानंतर या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:17 PM2021-04-29T18:17:38+5:302021-04-29T18:22:03+5:30

काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. अदिती मराठी आहे. त्यामुळे अदिती पारंपरिक मराठी अंदाजात नटली होती.

After ten years of marriage, Mohit Malik, Addite Malik blessed with a baby boy, see first photos | लग्नाच्या दहा वर्षानंतर या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

लग्नाच्या दहा वर्षानंतर या अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री अदिती मलिकने  गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पती मोहित मलिकने आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अदिती आणि मोहितचे हे पहिले बाळ आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी वाचून सहकलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अदिती आणि मोहितच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अदिती तिच्या प्रेग्नंसीमुळे खूप चर्चेत होती. बाळाचे आगमनाची आतुरतेने वाट पाहणारी अदिती प्रत्येक गोष्ट चाहत्यांसमोर शेअर करताना दिसली.

 

अखेर तो आनंदाचा क्षण आज तिच्या आयुष्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. अदिती मराठी आहे. त्यामुळे अदिती पारंपरिक मराठी अंदाजात नटली होती.

मोहित आणि आदितीची पहिली भेट टीव्ही सीरियल 'मिली' च्या सेटवर होती. 1 एप्रिल 2006 रोजी मोहितने आदितीला प्रपोज केले, त्यानंतर 4 वर्षांच्या डेटिंगनंतर 1 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न झाले.जेव्हा अदितीने मोहितला गुड न्यूज दिली त्याविषयी मोहितने मुलाखतीत सांगितले की, 'मी शूटिंग करत होतो. आदितीचा अचानक फोन आला आणि तिने ही चांगली बातमी दिली.  

 

ती जे म्हणाली हे ऐकून मी टेन्शनमध्ये आलो होते. अदिती म्हणाली, रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे, तेव्हा सगळीकडे कोरोनाचे वातावरण म्हणून मला वाटले की ती, कोविड -19च्या टेस्टबद्दल बोलते आहे. पण मग ती हसली आणि सांगितले की आपण पेरेंट्स बनणार आहोत. माझा यावर विश्वास बसत नव्हता आणि मी दोन दिवस तिला पुन्हा-पुन्हा हेच सांगत होतो की, पुन्हा चेक कर.

सोशल मीडियावर दिली गुडन्यूज 

मोहितने आदितीबरोबर फोटो सोशल मीडियावरही शेअर केला आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. मोहितने या फोटोसोबत लिहिले की, 'ज्या पद्धतीने मी तुझ्यावर हात ठेवला आहे ... मला धन्यवाद म्हणायचे आहे ... आम्हाला निवडल्याबद्दल. ज्या अनुभवातून आम्ही जातोय त्यासाठी देवा तुझे आभार मानतो. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू.आता दोनचे तीन होणार आहोत.

Web Title: After ten years of marriage, Mohit Malik, Addite Malik blessed with a baby boy, see first photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.