बेहद या मालिकेनंतर जेनिफर विंगेट दिसणार बेपनाह या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 16:01 IST2017-12-08T10:31:21+5:302017-12-08T16:01:21+5:30

बेहद या मालिकेत जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. ...

After this series, Jennifer Wingate will appear unconscious in this series | बेहद या मालिकेनंतर जेनिफर विंगेट दिसणार बेपनाह या मालिकेत

बेहद या मालिकेनंतर जेनिफर विंगेट दिसणार बेपनाह या मालिकेत

हद या मालिकेत जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. मायामध्ये असलेला वेडेपणा तिने तिच्या भूमिकेतून खूपच चांगल्याप्रकारे सादर केला होता. या मालिकेद्वारे जेनिफरने छोट्या पडद्यावर कमबॅक केला. या मालिकेच्या दोन वर्षं आधी तिने सरस्वतीचंद्र या मालिकेत काम केले होते. बेहद या मालिकेमुळे तिच्या करियरला एक चांगले वळण मिळाले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांचे कौतुक झाले होते. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांना निरोप घेतला असून प्रेक्षक या मालिकेला आणि आपल्या आवडत्या कलाकारांना खूप मिस करत आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. जेनिफर विंगेट आता प्रेक्षकांना नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
कलर्स वाहिनीवर बेपनाह ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक रोमँटिक मालिका असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत जेनिफर विंगेट प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसणार असून ती या मालिकेत झोयाची भूमिका साकारत आहे. जेनिफर या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत जेनिफर सोबत हर्षद चोप्राची मुख्य भूमिका आहे. हर्षद या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारणार आहे. तसेच सेहबान अझिम आणि नमिता दुबे यांच्यादेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. बेपनाह या मालिकेत झोयाची भूमिका साकारण्याविषयी जेनिफर सांगते, “मी या मालिकेचा भाग बनत असल्याबद्दल अतिशय रोमांचित आणि आनंदित आहे. बेपनाहचे कथानक खूपच चांगले आहे. मला माझे हे पात्र साकारण्याची आणि हर्षद सोबत काम करण्याची खूप उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांसाठी ही एक मेजवानीच ठरणार आहे.” 
जेनिफरने कुसूम, कसौटी जिंदगी की, दिल मिल गये, कोई दिल में है यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 

Also Read : जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवरच्या ब्रेकअपला बिपाशा बासु नाहीतर,कारणीभूत ठरला होता हा सिनेमा?

Web Title: After this series, Jennifer Wingate will appear unconscious in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.