"रिअ‍ॅलिटी शो विजेत्यांना काम मिळत नाही..", मराठीसिनेसृष्टीतील अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 15:33 IST2022-01-29T15:27:16+5:302022-01-29T15:33:30+5:30

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर काम मिळतं नाही असा आरोप आतापर्यंत अनेक कलाकारांनी केला आहे.

after reality show i dnt get role actress revealed | "रिअ‍ॅलिटी शो विजेत्यांना काम मिळत नाही..", मराठीसिनेसृष्टीतील अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

"रिअ‍ॅलिटी शो विजेत्यांना काम मिळत नाही..", मराठीसिनेसृष्टीतील अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर काम मिळतं नाही असा आरोप आतापर्यंत अनेक कलाकारांनी केला आहे. या गोष्टीमुळे अनेक कलाकार रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी देखील नकार देतात. आता आणखी एक अभिनेत्रीचं म्हणणे आहे की रिअ‍ॅलिटी शो विजेत्यांना काम मिळत नाही. ही अभिनेत्री स्वत: एका रिअ‍ॅलिटी शोची विजेती आहे. अप्सरा आली या शोची ही अभिनेत्री विजेती आहे. तिने हा खुलासा केल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. 

 'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्री माधुरी पवारने हा खुलासा केला आहे. उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी माधुरी कायमच प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन कलाकृती घेऊन येत असते. माधुरी लवकरच एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे. माधुरी लवकरच 'दिशाभूल' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पुण्यात मुहूर्त सोहळा पार पडला.

'दिशाभूल' हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही, मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग सुरू झालं असून नवीन टीम सोबत काम करताना मजा येत आहे, असं माधुरी म्हणाली.

Web Title: after reality show i dnt get role actress revealed