Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 05:10 PM2024-02-03T17:10:28+5:302024-02-03T17:10:51+5:30

Ankita Lokhande : सलमान खानचा लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १७चा फिनाले नुकताच पार पडला. त्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे या शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे.

After 'Pavitra Rishta', Ankita again got Ekta Kapoor's serial, 'Bigg Boss' brightened the fortune of the actress | Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

एकता कपूर(Ekta Kapoor)चा फँटसी मालिका 'नागिन'(Nagin)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत या मालिकेचे ६ सीझन भेटीला आले आहेत. त्यानंतर आता नागिनचा सातवा सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता मालिकेसंदर्भात एक वृत्त व्हायरल होत आहे. हे वृत्त वाचून प्रेक्षक थक्क होणार आहे. एका रिपोर्टनुसार, नागिन ७मध्ये बिग बॉस १७ (Bigg Boss 17)मध्ये झळकलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) दिसणार आहे.

सलमान खानचा लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १७चा फिनाले नुकताच पार पडला. त्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे या शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे. तिला बॉलिवूडचा चित्रपट मिळाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता तिला एकता कपूरच्या नागिन ७ मालिकेत कास्ट केल्याचे बोलले जात आहे. अंकिता लोखंडे आणि एकता कपूर यांच्यात गेल्या काही वर्षांपासून खूप चांगलं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. एकताने अंकिताला बिग बॉस १७मधील खरी स्पर्धक म्हटलं होतं. तसेच एकताच्याच पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिता अर्चना देशमुखच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. आजही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका घर करून कायम आहे.  

अंकिता या सीझनमध्ये दिसणार आहे
याशिवाय नागिन ७ साठी आयशा सिंह, प्रियांका चहर चौधरी आणि रिद्धिमा पंडित यांसारख्या आणखी काही अभिनेत्रींच्या नावाचाही विचार केला जात असल्याची बातमी आहे. नागिनच्या शेवटच्या सीझनला प्रियंका चहर चौधरीने नकार दिल्याचे समजते आहे. नागिन ७ साठी मुख्य पात्र म्हणून अनेक नावे चर्चेत आहेत, ज्यात पुरुष कलाकारांच्या नावांचाही समावेश आहे. या शोसाठी पहिले नाव समोर आले होते ते प्रतीक सहजपालचे. सध्या या शोसाठी आणखी काही नावे पुढे येत आहेत.

या मालिकेत अंकित गुप्ताची वर्णी 
X वरील काही हँडलनुसार, उर्वरित नावांमध्ये अविनाश मिश्रा, कुणाल जयसिंग आणि अंकित गुप्ता या नावांचा समावेश आहे. त्याचवेळी चाहत्यांना अंकित गुप्ताला एकता कपूरच्या प्रोडक्शनमध्ये पाहण्याची इच्छा आहे आणि जर असे घडले तर अंकित गुप्ता आणि अंकिता लोखंडे नागिन ७ मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत, ज्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. 

Web Title: After 'Pavitra Rishta', Ankita again got Ekta Kapoor's serial, 'Bigg Boss' brightened the fortune of the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.