'कोकण हार्टेड गर्ल'नंतर आणखी एका अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:01 IST2025-02-18T11:59:31+5:302025-02-18T12:01:14+5:30
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिने नुकतीच बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली. तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

'कोकण हार्टेड गर्ल'नंतर आणखी एका अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ
'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिने नुकतीच बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली. सध्या तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुकन्या काळण (Sukanya Kalan). तिने बॉयफ्रेंड रोशन माररसोबत लग्नगाठ बांधली आहे.
अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण हिने डिसेंबर, २०२३मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर तिने नुकतेच रोशन माररसोबत महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन पद्धतीने लग्न केले आहे. सुकन्याच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात मेहंदी, हळद आणि संगीत सेरेमनी पाहायला मिळत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, शाळेच्या वर्गातील हास्यापासून ते आयुष्यभराच्या आश्वासनांपर्यंत, आमची लव्ह स्टोरी बालपणात सुरू झाली आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासह ती अधिक घट्ट होत गेली. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
सुकन्या काळण झी मराठीवरील सचिन पिळगावकर यांच्या एकापेक्षा एक या डान्सिंग रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. महागुरू सचिन पिळगावकर यांनी तिला आपली मानसकन्याच मानले होते. त्यानंतर ती पुढच्या काही सीझनमध्ये ती कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. मग सुकन्याने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि बऱ्याच मालिकांमध्ये काम केले. सध्या ती मर्डरवाले कुलकर्णी या नाटकामध्ये काम करते आहे. याशिवाय लवकरच ती दमयंती दामले या नाटकांमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.