'झलक दिखला जा'च्या ११ व्या पर्वात शिव ठाकरे? 'खतरो के खिलाडी'नंतर आता डान्सचा मंच गाजवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:11 IST2023-10-18T17:08:33+5:302023-10-18T17:11:37+5:30

शिव ठाकरे टीव्हीवरचा प्रसिद्ध कार्यक्रम  'झलक दिखला जा सिझन ११' मध्ये दिसेल अशाही चर्चा रंगल्या आहेत.

After 'Khatro Ke Khiladi Shiv Thackeray in the 11th episode of Jhalak Dikhhla Ja | 'झलक दिखला जा'च्या ११ व्या पर्वात शिव ठाकरे? 'खतरो के खिलाडी'नंतर आता डान्सचा मंच गाजवणार

'झलक दिखला जा'च्या ११ व्या पर्वात शिव ठाकरे? 'खतरो के खिलाडी'नंतर आता डान्सचा मंच गाजवणार

मराठमोळा शिव ठाकरे सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होऊन त्याने सर्वांवर आपली छाप  पाडली आहे. ‘बिग बॉस’नंतर तो रोहित शेट्टी्च्या त्याला ‘खतरों के खिलाडी’ मध्ये पाहायला मिळाला. ‘खतरों के खिलाडी’ संपताच  शिवकडे नवीन प्रोजेक्टच्या ऑफर्सची रांग लागली आहे. आता शिव ठाकरे टीव्हीवरचा प्रसिद्ध कार्यक्रम  'झलक दिखला जा सिझन ११' मध्ये दिसेल अशाही चर्चा रंगल्या आहेत.

 'झलक दिखला जा सिझन ११' चा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये काही स्पर्धकांचे अर्धवट चेहरे दिसत आहेत. कोणाचाही चेहरा दाखवण्यात आला नसला तरी चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्टार्सला ओळखले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, अंजली आनंद, शोएब इब्राहिम आणि उर्वशी ढोलकिया यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.

'झलक दिखला जा 11' ची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा शो १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. या शोला फराह खान, अर्शद वारसी आणि मलायका अरोरा जज करणार आहेत. 'झलक दिखला जा' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला असा डान्स रिअॅलिटी शो आहे. हा शो २००६ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा शो कायम लोकप्रियतेच्या यादीत अव्वल होता.

 शिव ठाकरेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो 'खतरों के खिलाडी १३'च्या टॉप ५ फायनलिस्टपर्यंत पोहोचला होता. शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो. अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतलेल्या शिव ठाकरेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

Web Title: After 'Khatro Ke Khiladi Shiv Thackeray in the 11th episode of Jhalak Dikhhla Ja