'बिग बॉस मराठी'नंतर 'या' रिएलिटी शोमध्ये दिसणार अभिजीत सावंत, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:20 IST2024-11-07T15:18:25+5:302024-11-07T15:20:06+5:30

बिग बॉसनंतर आता आणखी एका रिएलिटी शोमध्ये अभिजीत हजेरी लावणार आहे.

after bigg boss marathi abhijeet sawant to see as guest in me honar superstar chote ustad grand finale | 'बिग बॉस मराठी'नंतर 'या' रिएलिटी शोमध्ये दिसणार अभिजीत सावंत, प्रोमो समोर

'बिग बॉस मराठी'नंतर 'या' रिएलिटी शोमध्ये दिसणार अभिजीत सावंत, प्रोमो समोर

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात अभिजीत सावंत सहभागी झाला होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला. सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिजीतने बिग बॉसच्या घरातील खेळानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉसनंतर आता आणखी एका रिएलिटी शोमध्ये अभिजीत दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'मध्ये अभिजीत दिसणार आहे. 

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. या महाअंतिम सोहळ्याला अभिजीत सावंत हजेरी लावणार आहे. या शोमधील त्याच्या प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत गाणं गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. अभिजीतबरोबर रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. 


छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धक महाअंतिम फेरीत पोहोचले आहेत. पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे आणि विरारच्या पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३' कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.

Web Title: after bigg boss marathi abhijeet sawant to see as guest in me honar superstar chote ustad grand finale