‘बिग बॉस’च्या घराबाहेरही अर्शी खानने सोडला नाही हितेनचा पिच्छा! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 09:51 IST2018-07-05T09:49:09+5:302018-07-05T09:51:06+5:30

‘बिग बॉस’ संपून इतके महिने झाले तरी अर्शी व हितेनची केमिस्ट्री मात्र जराही बदलली नाही.

after bigg boss hiten tejwani and arshi khan again appeared on tv show juzzbaatt | ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही अर्शी खानने सोडला नाही हितेनचा पिच्छा! पाहा, फोटो!!

‘बिग बॉस’च्या घराबाहेरही अर्शी खानने सोडला नाही हितेनचा पिच्छा! पाहा, फोटो!!

‘बिग बॉस11’मध्ये हितेश तेजवानी आणि अर्शी खान या दोघांनी प्रेक्षकांचे प्रचंड मनोरजंन केले. अर्शी सतत हितेनसोबत फ्लर्ट करताना दिसायची तर लाजऱ्या स्वभावाचा हितेन तिच्यापासून दूर पळत राहायचा/ ही अनोखी जोडी, अर्शीचे हितेनला छेडणे आणि हितेनचे लाजणे सगळेच अनोखे होते. ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानही या दोघांची चांगलीच मजा घेताना दिसला होता. ‘बिग बॉस’च्या घरात अर्शीने पूर्णवेळ हितेनचा पिच्छा पुरवला. किमान ‘बिग बॉस’च्या घराबाहेर तरी ती हितेनला सोडेल, असे वाटले होते. पण ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही अर्शीने हितेनला सोडलेले नाही.

 अलीकडे दोघे एका शोमध्ये एकत्र आलेत. हा शो म्हणजे राजीव खंडेलवालचा ‘जज्बात’ हा टॉक शो. या शोमध्ये अर्शी व हितेनचे एकत्र येणे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करून गेले.

 विशेष म्हणजे, ‘बिग बॉस’ संपून इतके महिने झाले तरी अर्शी व हितेनची केमिस्ट्री मात्र जराही बदलली नाही. म्हणजे, अर्शी पूर्णवेळ हितेनसोबत फ्लर्ट करत राहिली आणि हितेन लाजून लाजून लालेलाल झाला.

 या शोमधील काही फोटो पाहिल्यावर तुम्हाला यायचा तो अंदाज येईल. तूर्तात हा शो टेलिकास्ट व्हायचाय. तो होईल तेव्हा प्रेक्षकांचे किती मनोरंजन करेल, हे सांगणे नकोच.

अर्शी खानला ‘वादाची मलिका’ म्हटले जाते. कारण जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा सातत्याने ती वादाच्या भोव-यात राहायची. तिच्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. बिग बॉसच्या घरात प्रियांक शर्माने तिच्यावर निशाणा साधल्यानेच, तिचे काही भूतकाळातील प्रकरणे बाहेर आले होते. ड्रामा क्वीन हिना खाननेही तिच्यावर विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट केल्या होत्या. परंतु अर्शी खानने याची तमा न बाळगता बिग बॉसच्या घरात आपला जलवा कायम ठेवला. विकास गुप्ताबरोबरची तिचे मैत्री चर्चेचा विषय ठरली. घराबाहेर या दोघांमध्ये मैत्री कायम असल्याचे बोलले जाते. 

 

Web Title: after bigg boss hiten tejwani and arshi khan again appeared on tv show juzzbaatt