Rakhi Sawant and Arshi Khan to get screwed up; Sweat to see their brother! | राखी सावंत अन् अर्शी खानशी पंगा घेणे पडणार महागात; त्यांच्या भावाला बघून फुटणार घाम!

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत आणि अर्शी खान यांच्यातील मैत्री सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही काळापासून अर्शी आणि राखीला बºयाचदा एकत्र बघण्यात आले. त्यांच्यातील मैत्रीचे बरेचसे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. आता या दोघींचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राखी सावंत अर्शी खानसोबत दिसत आहे. या व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात राखीचा पहिलवान भाऊही दिसत आहे. होय, दोघींना भाऊ मिळाला असून, तो खूपच स्पेशल आहे. आता तुम्ही म्हणाल या दोघींचा भाऊ नेमका कोण? तर तो विश्व चॅम्पियन रेसलर खली आहे. राखी सावंत या व्हिडीओच्या माध्यमातून भाऊ खलीला आपल्या चाहत्यांना भेटविताना दिसत आहे. 
 

या व्हिडीओमध्ये राखी प्रेक्षकांसोबत बोलताना दिसत आहे. तिच्यासोबत अर्शी खानही दिसत आहे. अर्शी राखीला विचारते की, तू कशी आहेस? त्यावर राखी म्हणतेय जशी तू सोडून गेली होतीस अगदी तशीच आहे. त्यानंतर राखी खलीला म्हणतेत ‘भय्या कसा आहेस?’ त्यावर खली म्हणतो, ‘बहुत बढिया, बहुत बढिया. खूपच चांगले वाटत आहे तुम्हा सर्वांना भेटून.’ दरम्यान, अर्शीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की, २९ जून रोजी हिमाचल प्रदेश आणि ७ जुलैला सोलनमध्ये शो करणार आहे. या शोमध्ये माझ्या हॉटनेसबरोबरच खलीचा जलवाही बघावयास मिळणार आहे. तिने याबाबतची घोषणा अतिशय हटके पद्धतीने केली. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. 
 

हा व्हिडीओ बघून असे वाटते की, राखी-अर्शी-खली ही तिकडी काही तरी धमाल करणार आहे. कारण या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे हे तिघेही बिग बॉस या शोमध्ये सहभागी झाले आहेत. तिघांचाही बिग बॉसच्या घरातील प्रवास खूपच रंजक राहिला आहे. अशात या शोमध्येही तिघे जबरदस्त धमाल करतील, असेच काहीसे दिसत आहे. 
Web Title: Rakhi Sawant and Arshi Khan to get screwed up; Sweat to see their brother!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.