'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:08 IST2022-12-15T13:08:32+5:302022-12-15T13:08:53+5:30

अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबेडीत अडकली आहे.

After 'Balumama' fame Sumeet Pusavale, now this Marathmoli actress is stuck in marriage. | 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. आता तु्म्ही म्हणाल कोण आहेत ते बरं. अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले, अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबेडीत अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar). ती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

कृतिका तुळसकर हिने १४ डिसेंबर रोजी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाला सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. 

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेत कृतिका तुळसकर पाहायला मिळाली होती. शेवंताच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.  कृतिका गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच तिनं अनेक नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही काम करते.

तर विशाल देवरुखकर मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. विशालने बॉईज चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर बॉईज २ आणि बॉईज ३ आणि  गर्ल्स चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
 

Web Title: After 'Balumama' fame Sumeet Pusavale, now this Marathmoli actress is stuck in marriage.