​अखेर नैतिक परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 17:19 IST2016-09-09T11:49:18+5:302016-09-09T17:19:18+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करण मेहराने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्याच्यानंतर आता ...

After all, moral reversal | ​अखेर नैतिक परतला

​अखेर नैतिक परतला

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करण मेहराने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्याच्यानंतर आता नवीन नैतिक कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. देख भाई देख या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला विशाल सिंग या मालिकेत नैतिकची जागा घेणार अशी गेली कित्येक दिवसापासून चर्चा आहे. विशालच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. विशालने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. गणपतीची पूजा करताना नैतिकची एंट्री होणार आहे. पण नैतिक भारतात नाही तर केनियात असल्याचे दाखवले जाणार आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यातून तो वाचला असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: After all, moral reversal