अक्षया-हार्दिकनंतर आता आणखी एक मराठी कलाकार जोडपं लवकरच बांधणार लग्नगाठ, पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 19:17 IST2022-12-10T19:16:41+5:302022-12-10T19:17:14+5:30
२ डिसेंबर रोजी अक्षया देवधर-हार्दिक जोशीसोबतच अभिनेता आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले विवाह बंधनात अडकले. त्यानंतर आता आणखी एक मराठी कलाकार कपल लग्नगाठ बांधणार आहे.

अक्षया-हार्दिकनंतर आता आणखी एक मराठी कलाकार जोडपं लवकरच बांधणार लग्नगाठ, पार पडला साखरपुडा
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. २ डिसेंबर रोजी अक्षया देवधर (Akshaya Deodhar)-हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) - सानिया गोडबोले (Sania Godbole) विवाह बंधनात अडकले. त्यानंतर आता आणखी एक मराठी कलाकार कपल लग्नगाठ बांधणार आहे. हे कपल कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना. तर हे जोडपं म्हणजे लग्नाची बेडी मालिकेतला राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक (Sanket Pathak) आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम(Suparna Shyam). नुकताच त्या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री सुपर्णा श्यामने इंस्टाग्रामवर रिंगचा फोटो शेअर करत सांगितले की, आणि मी हो म्हटलं, आमचा एकत्र प्रवास सुरु झाला. कुठे, कधी, कसं इत्यादी इत्यादी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक या दोघांनी दोन मालिकेत एकत्र काम केले आहे. दुहेरी या मालिकेत सुपर्णाने प्रमुख भूमिका साकारली, तर संकेतने या मालिकेत विक्रमची भूमिका निभावली होती. विक्रमची बालपणीची मैत्रीण निलमची भूमिका साकारताना संकेत सोबत तिची छान मैत्री झाली. छत्रीवाली या मालिकेतून सुपर्णाने दुसऱ्यांदा संकेत सोबत स्क्रीन शेअर केली. या मालिकेमुळे दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. एकत्र पार्टी करणे, फिरत असल्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे अशी चर्चा रंगली होती.
संकेत पाठकला जय हो या मालिकेमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली. कलर्स मराठी वाहिनीवर माझा होशील का मालिकेत तो समर भागवत नावाच्या श्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारली. दुहेरी, लग्नाची बेडी, छत्रीवाली, प्रीत का दामन, मेरी निगाहें यासह अनेक हिंदी मराठी भाषिक मालिकांमधून तो प्रसिद्धीस आला. सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक विवाह बंधनात कधी अडकणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.