तरीही शमिता शेट्टीने थांबवले नाही शूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 07:15 IST2019-02-21T07:15:00+5:302019-02-21T07:15:00+5:30

लोकप्रिय टेलिव्हिजन शो खतरों के खिलाडीच्या नवीन पर्वानिमित्त अर्जेंटिनामध्ये शूटिंग करताना अभिनेत्री शमिता शेट्टीकडे तिथले अनेक अविस्मरणीय अनुभव आहेत.

After accident Shamita Shetty still did not stop shoot! | तरीही शमिता शेट्टीने थांबवले नाही शूट!

तरीही शमिता शेट्टीने थांबवले नाही शूट!

ठळक मुद्देस्टंट करताना शमिता शेट्टीला जबरदस्त मार बसला

लोकप्रिय टेलिव्हिजन शो खतरों के खिलाडीच्या नवीन पर्वानिमित्त अर्जेंटिनामध्ये शूटिंग करताना अभिनेत्री शमिता शेट्टीकडे तिथले अनेक अविस्मरणीय अनुभव आहेत. मात्र या रिऍलिटी शोच्या शूटिंगदरम्यान साहस दाखवत विविध आव्हानात्मक स्टंट्स पूर्ण करत असताना शमिताला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले.     

अलीकडच्या एपिसोडमध्ये शमिता तिच्या टीमची प्रमुख असल्याचे दाखवण्यात आले. त्यानिमित्त तिला अनेक टास्क्स पूर्ण करायला देण्यात आले होते. एका हवेत फेकणाऱ्या मशीनवर तिला जायचे होते ज्यामुळे ती त्याच्या खालील जाळ्यात पडेल आणि देण्यात आलेले झेंडे पाण्यात फेकेल. दुर्दैवाने हा स्टंट करताना या अभिनेत्रीला जबरदस्त मार बसला. तिच्या शरीरात तीव्र कळा आल्या आणि काही मांसपेशींना मोठी दुखापतही झाली. मात्र तिने शो दरम्यान हा त्रास झाल्याचे दाखवले नाही. इतका त्रास सहन करत असतानाही  शमिताने डॉक्टरांना दाखवायच्या आधी एका स्टंटसाठी व्हॉलंटिअरींग केले. खरे तर या स्टंटमधून आणखीन मार बसण्याची शक्यता असल्याने तिची मानेची दुखापत आणखीन वाढण्याचे संभाव्य  होते. त्यामुळे स्टंट न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र कुठल्याही परिस्थितीत तिच्यामुळे शूट थांबणार नाही याची शमिताने काळजी घेतली. अशावेळी एवढी दुखापत झालेली असतानाही शमिताने शूटिंग पूर्ण केले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, 'एका स्टंटमुळे शमिताला चांगलीच दुखापत झालेली असतानाही तिने शेवटपर्यंत शूटिंग केले. यातून तिची चिकाटी आणि प्रोफेशनलिझम दिसले. तिने प्रत्येक स्टंट साहस दाखवत सर्वतोपरी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ही स्पर्धा असून प्रत्येक स्पर्धकाला त्यात जिंकायचे आहे'.

Web Title: After accident Shamita Shetty still did not stop shoot!