मुलगा बनणे एन्जॉय करते : आदिती भाटिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 15:17 IST2016-06-01T09:47:21+5:302016-06-01T15:17:21+5:30
यै है मोहब्बते या मालिकेत रुही मोठी झाल्यावर ती आता रुहान बनली आहे. रुहानची भूमिका आदिती भाटिया ही अभिनेत्री साकारत ...
मुलगा बनणे एन्जॉय करते : आदिती भाटिया
य है मोहब्बते या मालिकेत रुही मोठी झाल्यावर ती आता रुहान बनली आहे. रुहानची भूमिका आदिती भाटिया ही अभिनेत्री साकारत आहे. मुलगी असताना मुलाची भूमिका साकारणे हे आव्हानात्मक असल्याचे तिचे म्हणणे आहे. मुले कशाप्रकारे चालतात, बोलताना त्यांची देहबोली कशाप्रकारे असते या गोष्टींचा अभ्यास या भूमिकेसाठी करावा लागला असे ती सांगते. मुलगी असूनही मुलाची भूमिका साकारणे हे मी खूप एन्जॉय करत असल्याचे तिचे म्हणणे आहे. आदितीचे केस प्रचंड मोठे असून ते कंबरेच्याही खाली आहेत. त्यामुळे इतके मोठे केस बांधणे आणि त्यावर विग लावणे या गोष्टीसाठी खूप जास्त वेळ लागतो असे आदिती सांगते.