फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:36 IST2024-06-17T17:35:51+5:302024-06-17T17:36:07+5:30

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

aditi dravid dance with her grand mother on angaron sa pushpa movie allu arjun rashmika mandanna song | फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनाही या गाण्याने भुरळ पाडली आहे. अनेक मराठी कलाकारांनी अंगारो सा गाण्यावर डान्स करत त्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आता मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अदिती तिच्या आजीबरोबर अंगारो सा गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसंच या गाण्याच्या हुक स्टेप्सही केल्याचं पाहायला मिळत आहेत. 

"माझी पुष्पा...फायर है फायर", असं कॅप्शन देत अदितीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अदितीच्या आजीचा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. "आजींचा चाहता वर्ग वाढेल आता", "किती गोड", "मी तुझ्या आजीची फॅन झाले", "आजी रॉक्स", "आजी मस्तच" अशा कमेंट करत चाहत्यांनी अदिती आणि तिच्या आजीचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, अदितीने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतही ती झळकली होती. 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील मंगळागौर गाण्यामुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली होती. तिने लिहिलेल्या या गाण्याला लोकप्रियता मिळाली. 

Web Title: aditi dravid dance with her grand mother on angaron sa pushpa movie allu arjun rashmika mandanna song