अदिती आणि रुहानाचा जिव्हाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 15:11 IST2016-10-01T09:41:44+5:302016-10-01T15:11:44+5:30
कलाकारांमधील भांडणं आणि वाद नेहमीच आपण ऐकतो. मात्र कलाकारांमध्ये एकमेंकांप्रती प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाल्याचीही अनेक उदाहरण पाहायला मिळतात. ...

अदिती आणि रुहानाचा जिव्हाळा !
क ाकारांमधील भांडणं आणि वाद नेहमीच आपण ऐकतो. मात्र कलाकारांमध्ये एकमेंकांप्रती प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाल्याचीही अनेक उदाहरण पाहायला मिळतात. छोट्या पडद्यावर मायलेकीची भूमिका साकारणा-या गंगा आणि कृष्णा (अदिती शर्मा आणि रुहाना खन्ना) यांच्यातही प्रेमळ नातं पाहायला मिळतं. मालिकेतील त्यांच्या मायलेकीच्या नात्याचा प्रभाव प्रत्यक्ष जीवनातही पाहायला मिळतोय. मालिकेच्या सेटवर अदिती रुहानाची लेकीप्रमाणे काळजी घेतात. तिच्या संवादाच्या ओळी पाठ करुन घेण्यातही अदिती रुहानाला मदत करतात. इतकंच नाही तर रुहाना काही संवाद विसरल्यास त्या इशारे करुन तिला सांगतात. त्यामुळं सेटवर या दोघींच्या नात्यातील या जिव्हाळापूर्ण संबंधांच्या चर्चा जास्त रंगतात.