आदिनाथ कोठारे घेऊन येतोय आगळीवेगळी मालिका, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:30 IST2019-10-28T06:30:00+5:302019-10-28T06:30:00+5:30

अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारे निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीसाठी आगळीवेगळी मालिका घेऊन येत आहे.

Adinath Kothare's as producer new serial Prem Poison Panga | आदिनाथ कोठारे घेऊन येतोय आगळीवेगळी मालिका, वाचा सविस्तर

आदिनाथ कोठारे घेऊन येतोय आगळीवेगळी मालिका, वाचा सविस्तर

अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारे निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीसाठी आगळीवेगळी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचं नाव आहे 'प्रेम, पॉयजन, पंगा'. ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज रात्री ८:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. प्रोमो बघूनच प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढलेली आहे. 

'इच्छाधारी नागीण' हा विषय मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच हाताळण्यात येत आहे. 'कोठारे व्हिजन' या मालिकेची निर्मिती करत आहे. 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहायची संधी मिळणार असल्याने, महेश कोठारेंच्या ऐवजी, यावेळी आदिनाथ कोठारे निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. वेगळ्या धाटणीची मालिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

'इच्छाधारी नागीण' म्हणजे नकारात्मक भूमिका, हे समीकरण बदलून, एक हवीहवीशी प्रेमळ नागीण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेतील कलाकार म्हणून, दोन नवे चेहरे सुद्धा या मालिकेत पाहायला मिळतील. 


आदिनाथ कोठारे याबद्दल म्हणाले की, 'इच्छाधारी नागीण' या विषयावर एखादी मालिका सुरु करायची एवढाच विचार डोक्यात होता. पण, या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली, आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं. त्यामुळे हलकीफुलकी पण तरीही 'मॅड' अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. म्हणूनच तिला 'प्रेम, पॉयजन, पंगा' असं निराळं नाव देण्यात आलं. 'इच्छाधारी नागीण' हा विषय वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येतो आहे. एक उत्तम 'सिटकॉम' पाहण्याची संधी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.' 

Web Title: Adinath Kothare's as producer new serial Prem Poison Panga