Shocking क्रितिका कामराला आहे या गोष्टीचे व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 11:20 IST2017-04-07T05:50:28+5:302017-04-07T11:20:28+5:30
क्रितिका कामरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल आहे. आता ब-याच दिवसांपासून प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेमुळे नेहमीच ...
-acthost_blogspot_com.jpg)
Shocking क्रितिका कामराला आहे या गोष्टीचे व्यसन
क रितिका कामरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल आहे. आता ब-याच दिवसांपासून प्रेम या पहेली चंद्रकांता या मालिकेमुळे नेहमीच चर्चेत असते.त्यात ती राजकन्या चंद्रकांताच्या भूमिकेत दिसत आहे. ती प्रथमच ऑनस्क्रीन राजकन्येची भूमिका करत आहे आणि तिचा लूक आणि अभिनय पाहून प्रेक्षकांनाही तिची भूमिका तिचा मालिकेतील लूकमुळे ही मालिका पसंतीस उतरत आहे.कृतिकाच्या अभिनयाने खुश झालेल्या रसिकांना मात्र तिच्या एका सवयीचे रहस्य कळताच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, या इंडस्ट्रीत अनेक कलाकरांना काही ना काही गोष्टींचे व्यसन हे असतेच, ब-याचवेळा हे कलाकार त्यांच्या सेटवर शूटिंगमधून मिळालेल्या वेळत त्याच गोष्टी करताना दिसतात. या गोष्टीपासून कृतिकाही स्वत:लाही सावरू शकली नाहीय.अहो आपल्या सर्वसामान्याप्रमाणेच क्रितिकाला एका गोष्टीचे अक्षरशः व्यसन आहे आणि ते म्हणजे ती खूप नेटसॅव्ही असून तिला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप आवड आहे. त्यासाठी ती नेहमी गूगल सर्च करत असते.क्रितिका कामरा म्हणते, “मला अनेक गोष्टींचे कुतूहल आहे. त्यामुळे मला गूगलची फार गरज लागते.म्हणजे जर मी एखादा नवीन शब्द ऐकला तर मी तो गूगल करते, एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जात असेन तर गूगलवर मेनू आधीच पाहते. मी गूगलचा एवढा वापर करते की मला त्याचे व्यसन आहे असे म्हटले तरी ते खोटे ठरणार नाही. उच्चार समजून घेण्यासाठी मी फॉरेन शब्दसुद्धा गूगल करते. एखादा चित्रपट पाहून आले की त्याबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी मी गूगल करते. त्यामुळे गूगलच माझा बेस्ट फ्रेंड आहे असे मी मानते.”