ही अभिनेत्री कॅथलिक असूनही शिकली भोजपुरी,समोर आले हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:41 IST2018-03-06T10:11:43+5:302018-03-06T15:41:43+5:30

राजकीय परिस्थितीवरील विडंबनात्मक भाष्य करण्यासारख्या विशेष गटातील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही ‘स्टार प्लस’वरील आगामी मालिका प्रेक्षकांमध्ये ...

The actress, who was also a Catholic, learned about Bhojpuri because it came in front of me | ही अभिनेत्री कॅथलिक असूनही शिकली भोजपुरी,समोर आले हे कारण

ही अभिनेत्री कॅथलिक असूनही शिकली भोजपुरी,समोर आले हे कारण

जकीय परिस्थितीवरील विडंबनात्मक भाष्य करण्यासारख्या विशेष गटातील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही ‘स्टार प्लस’वरील आगामी मालिका प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा रंगत आहे.या मालिकेतील व्यक्तिरेखांची भाषा प्रामुख्याने हिंदी असली,तरी तिच्या विनोदी बाज वाढावा यासाठी तिला भोजपुरी बोलीचा तडका देण्यात आला आहे.या मालिकेत मलाईची (भ्रष्ट नेता चैतूलालची मेहुणी) भूमिका रंगविणारी अभिनेत्री मेलिसा पैस ही आनंदी स्वभावाची असून तिला भोजपुरी गाण्यांच्या तालावर नाचण्याची आवड आहे. यापूर्वी काही हिंदी टीव्ही मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या असल्या, तरी तिला या मालिकेची भोजपुरी ढंगाची भाषा बोलणे कठीण जात होते. मेलिसा म्हणाली, “मी मुळात गोव्यातील कॅथलिक ख्रिस्ती असले, तरी मी बरीच वर्षं मुंबईत राहिले आहे आणि अनेक हिंदी मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या आहेत. मी जेव्हा हिंदी मालिकांमध्ये प्रथम भूमिका रंगविण्यास सुरुवात केली,तेव्हा मला हिंदी बोलणंही अवघड जात होतं. आता या मालिकेत मला मलाईच्या भूमिकेत भोजपुरी ढंगाची हिंदी बोलायची आहे.मला ही भाषा बोलता येईल की नाही,याबद्दल मी साशंक होते.पण शेवटी मी या समस्येवर मात करण्याचा निर्धार केला आणि मला ही भाषा शिकविण्यासाठी एका भोजपुरी शिक्षकाची नेमणूक केली. ही भाषा शिकता शिकता मी तिच्या प्रेमात पडल्याने मला ही भाषा शिकणंही मजा वाटू लागली.” आपल्या मलाई या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा मेलिसा प्रयत्न करणार आहे.कारण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक अशी भूमिका असल्याचे तिला वाटते.

‘हर शाख पे ऊल्लू बैठा है’ सह. हा मुख्यमंत्री निरागस जनतेला खोटी आश्वासने देऊन भूलवण्यासाठी मानला जातो.अन्य कुठल्याही नेत्याप्रमाणे चैतू हा कटकारस्थानी आहे,शब्दांचा खेळ करणारा आणि संधीसाधू आहे.त्याच्या ठेंगा पार्टीला केवळ काळ्‌या पैशाची हाव आहे आणि त्यासाठी सिस्टममध्ये काहीही कारस्थाने ते करू शकतात.सामान्य लोकांना ज्या गोष्टीचा फायदा होईल त्याची वचने तो देतो पण त्याला ज्याचा फायदा होईल ते तो करतो. ह्या कॉमेडी शोमध्ये त्याला समर्थन देईल त्याची पत्नी इमली देवी (समता सागर).आयुष्यातील प्रत्येक चांगल्याकठीण परिस्थितीमध्ये ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते. जरी चैतू सत्ताधारी पक्षाचा नेता असला तरी घरी मात्र त्याची पत्नीच त्याच्यासाठी आधारस्तंभ आहे.इमलीला आपला भाऊ आणि सीएमचा उत्साही साला पुतन (इश्तियाक खान) ला देशाचा पंतप्रधान बनलेले पाहायचे आहे. आपल्या राज्यातील युवानेता पुतन आपल्या जिजाजीसारखाच धोरणी आहे. त्याच्या विरोधात पोलिसात १३ गुन्हे दाखल असून त्याने राज्यातील सर्व उत्तम महाविद्यालयांमधून पदव्या विकत घेतल्या आहेत.राजकारण आणि भ्रष्टाचारामध्ये पुतन चैतूपेक्षा अजिबात कमी नाहीये.हा शो सामान्य माणसाच्या समस्यांकडे विडंबनात्मक पद्धतीने पाहतो. यात चैतू लाल सामान्य माणसांच्या समस्या जसे शिक्षण, पायाभूत सुविधा,भ्रष्टाचार इत्यादींसोबत लढताना आणि निवडणूकांमधील धांदली,एमएलएची खरेदी विक्री आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या काहीही कमिट्‌या निर्माण करतानाही पाहायला मिळेल.

Web Title: The actress, who was also a Catholic, learned about Bhojpuri because it came in front of me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.