'ही' अभिनेत्री घेतेय 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 09:56 IST2018-07-21T13:10:28+5:302018-07-22T09:56:06+5:30
अपूर्वाने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत एंट्री घेतली आहे. या मालिकेत अपूर्वा आता प्रियंका नावाची शनायाच्या घरात काम करणारी अवलिया मोलकरणीण साकारते आहे,

'ही' अभिनेत्री घेतेय 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत एंट्री
ज्या टीव्ही मालिकेच्या आपण प्रेमात पडावं.. आणि पाहता पाहता आपण त्या मालिकेत काम करावं..हे सर्व तुम्हाला स्वप्नमय वाटत असणार, परंतु हे सत्यात अवतरलं आहे ते पुण्याच्या अपूर्वा चौधरीच्या बाबतीत. पुण्याच्या ललित कला केंद्राची विद्यार्थिनी असलेल्या अपूर्वा ने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत एंट्री घेतली आहे. या मालिकेत अपूर्वा आता प्रियंका नावाची शनायाच्या घरात काम करणारी अवलिया मोलकरणीण साकारते आहे, पहिल्याच भागात तिच्या धमाकेदार एंट्रीचे सगळीकडे कौतुक झाले.
ललित कला केंद्र मधून नाट्यशास्त्राची पदवी घेऊन मुंबईत आल्यावर सुसाट नावाचे नाटक, दुहेरी नावाची मालिका, क्राईम फाईल, क्राईम पेट्रोल यात छोट्या मोठ्या भूमिका अपूर्वा करत होती. अचानक तिला माझ्या नवऱ्याची बायको मालिकेकरता ऑडिशनसाठी बोलावण्यात आले, आणि पहिल्याच प्रयत्नात अपूर्वाची निवड करण्यात आली. या भूमिकेबद्दल अपूर्वा सांगते की, जरी ही मोलकरणी भूमिका असली तरी धमाल विनोदी अशी भूमिका आहे, शनायाला पुरून उरेल असा तिचा स्वभाव आहे, कानात हेडफोन घालून गाणे ऐकत काम करणे तिची सवय आहे. खरंतर प्रियंका वेगळाच हेतू घेऊन आली आहे, मालिका पाहताना प्रेक्षकांना समजेलच. सर्वांसोबत काम करताना खूप मज्जा आली, कुणीही दडपण जाणवू दिले नाही. सगळ्यांप्रमाणे माझीही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अपेक्षा करते.'' राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी अभिजीतने मोठ्या खुबीने रंगवला. घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. याशिवाय अपूर्वाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील तयार होत असलेल्या हिंदी सिनेमात देखील तिची भूमिका आहे.