ठरलं तर मग! पूर्णाआजींच्या भूमिकेत दिसणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:14 IST2025-09-07T13:09:46+5:302025-09-07T13:14:35+5:30
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर आता ही अभिनेत्री ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजींच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे

ठरलं तर मग! पूर्णाआजींच्या भूमिकेत दिसणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'ठरलं तर मग' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे अनेकांना दुःख झालं. ज्योती चांदेकर यांनी 'ठरलं तर मग' मालिकेत साकारलेली पूर्णा आजींची भूमिका चांगलीच गाजली. ज्योती यांच्या निधनामुळे मालिकेतील अनेक चाहते त्यांना मिस करत आहेत. ज्योती यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर याचा खुलासा झाला आहे. पूर्णा आजींच्या भूमिकेसाठी मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
ही अभिनेत्री साकारणार पूर्णा आजीची भूमिका?
'ठरलं तर मग' मालिकेत आता पूर्णाईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस पाहायला मिळणार आहेत. याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. स्वाती चिटणीस यांनी अलीकडेच स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून एक्झिट घेतली. ही मालिका सोडल्यानंतर स्वाती या 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला आहे. याविषयी पहिला प्रोमो किंवा स्टार प्रवाहकडून अधिकृत घोषणा कधी होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
स्वाती यांच्या जागी ही अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा'मध्ये दिसणार
'तू ही रे माझा मितवा' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील ईश्वरी-अर्णवच्या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. अभिनेता अभिजीत आमकर, शर्वरी जोग यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. याशिवाय रुपल नंद, सुरभी भावे, मधुरा जोशी आशुतोष देशमुख आणि स्वाती चिटणीस या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. त्यात मालिकेत अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी अर्णवच्या आजीची भूमिका साकारली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना पंडित यांची एन्ट्री झाली आहे. दरम्यान स्वाती यांना 'ठरलं तर मग' मालिकेत पाहण्यास सर्वांना उत्सुकता आहे.