DP तुझा पाठीराखा पण त्याच्यासोबतच गेम खेळतेस..; धनंजयला नॉमिनेट केल्याने सोनाली अंकितावर चिडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 11:14 IST2024-08-27T11:12:25+5:302024-08-27T11:14:20+5:30

काल अंकिताने नॉमिनेशन टास्कमध्ये DP दादाला नॉमिनेट केलं. त्यामुळे सोनालीने अंकितावर राग व्यक्त केलाय (ankita walawalkar, bigg boss marathi 5)

actress sonali patil angry on ankita walawalkar kokan hearted girl who nominate dhananjay powar dp in bigg boss marathi 5 | DP तुझा पाठीराखा पण त्याच्यासोबतच गेम खेळतेस..; धनंजयला नॉमिनेट केल्याने सोनाली अंकितावर चिडली

DP तुझा पाठीराखा पण त्याच्यासोबतच गेम खेळतेस..; धनंजयला नॉमिनेट केल्याने सोनाली अंकितावर चिडली

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल नॉमिनेशन टास्क झाला. मानकाप्याच्या खोलीत प्रत्येक सदस्याला दोन जोड्यांना नॉमिनेट करायचं होतं. यावेळी अंकिताने वैभव आणि DP अर्थात धनंजय पोवारच्या जोडीला नॉमिनेट केलं. अंकिताने DP दादाला नॉमिनेट केल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. अंकिता आणि DP ची बॉंडींग आपण सर्वांनी पाहिलीय. काही दिवसांपूर्वी अंकिताने DP ला राखीही बांधली. अंकिताने DP ला नॉमिनेट केल्याने बिग बॉस मराठी ३ ची स्पर्धक सोनाली पाटील चांगलीच चिडलेली दिसली.

सोनाली अंकिताला काय म्हणाली?

सोनाली पाटीलने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती चिडून म्हणते, "काल बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला. अंकिता तुला जान्हवीबद्दल खूप प्रेम आहे. तुला सूरजबद्दल प्रेम आहे. आम्हालाही सूरजबद्दल खूप प्रेम आहे. पण आम्हाला एक गोष्ट कळत नाहीय. तू DP दादा आणि वैभवला नॉमिनेट केलंस. वैभव ठीक आहे पण DP दादा वैभवच्या जोडीला आहे. त्यामुळे तू त्यांचं नाव वगळायला पाहिजे होतंस. DP दादा आणि तुझा बहीण-भावाचा बॉंड खूप छान आहे. घराच्या आतमध्ये आणि बाहेर एक फेवरिझम असणं गरजेचं आहे."


सोनाली पुढे म्हणाली, "DP दादा कोणत्याही टास्कमध्ये तितका दिसला नसेल पण प्रत्येकवेळी तो तुला सजेशन करताना दिसतो. DP दादा तुझा भाऊ आहे, तुझा पाठीराखा आहे. आणि तू DP दादा बरोबर गेम खेळतेस. मला हे अजिबात पटलेलं नाहीय. तू तिकडे अजून जोड्या होत्या त्यांना नॉमिनेट केलं असतंस. आणि अंकिता तू कारण काय देतेस तर.. DP दादाने पुढे जाऊन खेळावं. म्हणजे!! आता सुद्धा तो खेळतोय. फक्त एक पॉईंट यावा लागतो तिथे जास्त लोक आपल्याला ओळखतात. असा एखादा टास्क यावा लागतो. DP दादा जरी नॉमिनेशनमध्ये गेला तरीही आम्ही सगळे त्याच्या बरोबर आहोत. पण अंकिताचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीय."

Web Title: actress sonali patil angry on ankita walawalkar kokan hearted girl who nominate dhananjay powar dp in bigg boss marathi 5