अभिनेत्री स्नेहा वाघ रमली चित्रकलेत, प्रदर्शनही भरवण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:02 IST2021-08-30T16:01:31+5:302021-08-30T16:02:18+5:30
शूटिंगच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ का़ढत स्नेहाने आपली चित्रकलेची आवड जपलेली आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघ रमली चित्रकलेत, प्रदर्शनही भरवण्याची इच्छा
अभिनेत्री स्नेहा वाघने 'काटे रूते कुणाला' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. आपल्या शास्त्रीय नृत्य कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर हिंदी टेलिव्हिजनविश्वात 'ज्योती' नावाने ओळखली जाणारी स्नेहा एक उत्तम चित्रकार देखील आहे. शूटिंगच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ का़ढत स्नेहाने आपली चित्रकलेची आवड जपलेली आहे. एक्रेलीक पेंटींग्ज असो वा फ्री हँड स्कॅच असो स्नेहाचे हात कॅनव्हास लिलया फिरतात.
आपल्या या कलेबद्दल स्नेहा वाघ म्हणाली की, मला रंग खूप आवडतात, रिकाम्या वेळेत मला एखादा कागद मिळाला तर माझ्यातला चित्रकार जागा होतो. मी अनेक रफ स्केच बनवले आहेत, जे मी पूर्ण केलेले नाहीत. माझ्या बाबांची इच्छा होती की, माझे हे सर्व स्केच मी पूर्ण करावेत, त्या सर्व पेंटींग्जचे एक्झिबिशन भरवावे. कदाचित पुढे जाऊन त्याचा मी विचार ही करेल.
स्नेहाच्या बाबांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या आठवणीत ती भावूक होते. स्नेहाला पुन्हा एकदा मराठीत काम करायचे आहे, मराठीत काम करणार का, असे विचारल्यानंतर तिने मला मराठीत काम करायला नक्की आवडेल असे म्हटले.
आपल्या माणसांसोबत काम करण्याची भावना ही वेगळीच असते. त्यासाठी चांगल्या संधीची वाट पाहत असल्याचे तिने पुढे सांगितले.