कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार?,'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत होणार दुर्गा आत्याची एंट्री, जाणून घ्या याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:00 IST2022-11-03T08:00:00+5:302022-11-03T08:00:02+5:30
कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे.

कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार?,'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत होणार दुर्गा आत्याची एंट्री, जाणून घ्या याविषयी
'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात.
मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत.
या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभा ताई म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही माझी सर्वात आवडती मालिका आहे मी दररोज आवर्जून पहाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र माझ्या आवडीचं आहे. मला जेव्हा या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. या मालिकेत मी दुर्गा आत्याची भूमिका साकारणार आहे. वरवर पहाता कठोर वाटणारी दुर्गा आत्या मनाने खुपच हळवी आहे. तिच्या येण्याने कथानकात नेमका कोणता ट्विस्ट येणार? कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.