प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:57 IST2025-06-11T13:57:19+5:302025-06-11T13:57:59+5:30

दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्रीने पहिल्या बाळाला जन्म दिला.

actress shireen mirza blessed with a baby boy shared good news on social media | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?

'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्री शिरीन मिर्झाने (Shireen Mirza) मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर तिने ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शिरीनने  हसन सरताजसोबत चार वर्षांपूर्वी निकाह केला होता. दोन दिवसांपूर्वी ९ जून रोजी शिरीनला मुलगा झाला. त्यांनी गोड व्हिडिओ पोस्ट करत सर्वांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

'ये है मोहोब्बते' या गाजलेल्या मालिकेत इशिताच्या नणंदेची भूमिका साकारलेली अभिनेत्री शिरीन मिर्झा आता आई झाली आहे. शिरीन आणि पती हसनने एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, "देवाच्या कृपेने मुलगा झाला. या सुंदर आशीर्वादासाठी देवाचे खूप खूप आभा. आम्हाला नवं प्रेम मिळालं. आम्ही या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहोत. आमच्यासाठी कायम प्रार्थना करा"


शिरीनच्या या पोस्टवर रश्मी देसाई, कृष्णा मुखर्जी, दिव्यांका त्रिपाठीसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट तर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शिरीन आणि हसन सरताज यांनी २०२१ मध्ये निकाह केला होता. शिरीनला कायमच आपलं एक कुटुंब हवं असं वाटत होतं. तिचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. कपलने प्रेग्नंसी फोटोशूटही केलं होतं जे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

शिरीन मिर्झा शेवटची 'ये है चाहते'मध्ये दिसली. यात तिने नित्या बाजवाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 'बहुत प्यार करते है','ढाई किलो प्रेम','ये है आशिकी','गुटर गू','अनहोनियो का अंधेरा' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

Web Title: actress shireen mirza blessed with a baby boy shared good news on social media