अभिनेत्री शगुफ्ता अलीवर आली घरातलं सामान विकण्याची वेळ, उपचारालाही नाहीत पैसे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:25 PM2021-07-06T12:25:55+5:302021-07-06T12:27:03+5:30

ससुराल सिमर का, पुनर्विवाह, एक वीर की अरसदास वीरा, मधुबाला यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांबरोबरच सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या आजारपण आणि आर्थिक तंगी अशा दोन्हीच्या कचाट्यात सापडली आहे.

actress shagufta ali financial mess no work seeks help for medical treatment | अभिनेत्री शगुफ्ता अलीवर आली घरातलं सामान विकण्याची वेळ, उपचारालाही नाहीत पैसे!!

अभिनेत्री शगुफ्ता अलीवर आली घरातलं सामान विकण्याची वेळ, उपचारालाही नाहीत पैसे!!

googlenewsNext
ठळक मुद्देमी आजारी आहे, आई आजारी आहे. मला काम हवंय, मदत हवीयं, असे शगुफ्ता म्हणाली.

गेल्या 36 वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सध्या अनेक अडचणींचा सामना करतेय. होय, अभिनेत्री शगुफ्ता अलीवर (Shagufta ali) सध्या बिकट परिस्थिती ओढवली आहे. कोरोना काळात हाताला काम नसल्याने आर्थिक विवंचना त्यांना सहन करावी लागतेय. अगदी स्वत:च्या आणि आजारी आईच्या उपचारासाठीही तिच्याजवळ पैसे नाहीत.
शगुफ्ता अलीने 15 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय.   20 पेक्षा जास्त लोकप्रिय मालिकांमध्ये  दर्जेदार भूमिका वठवल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी शगुफ्ताने कामास सुरूवात केली होती. आज तिचे वय 54 वर्ष आहे.  पण कोरोना काळात काम नाही, पैसे नाहीत, अशा अवस्थेत तिच्यावर घरातील सामान विकण्याची वेळ आली आहे.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ताने आपबीती सांगितली. (actress Shagufta Ali  financial mess )

मी 20 वर्षांपासून आजारी...
शगुफ्ता 20 वर्षांपासून आजारी आहे. तिला तिसºया स्टेजचा कॅन्सर होता. या आजाराला तिने खंबीरपणे झुंज दिली आणि लढाई जिंकली. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मी गेल्या 20 वर्षांपासून आजारी आहे पण त्यावेळेस तरूण होते आणि आजारपणाचा सामना करु शकत होते. मला तिसºया स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर होता पण मी त्यातून बाहेर आले. पहिल्यांदा मी माझ्या या आजारपणाबद्दल बोलतेय. आत्तापर्यंत माझे जवळचे काही मित्र सोडले तर कोणालाही माझ्या आजारपणाबद्दल काही माहित नव्हते.
  मला कॅन्सरची गाठ हटवण्यासाठी मोठी सर्जरी करावी लागली. त्यासाठी मी किमोथेरपी
केली. त्या अवस्थेत मी छातीला कुशन लावून सतराव्या दिवशी दुबईला शुटींगला गेले होते.  त्याच शुटींगच्या काळात माझे काही अपघात झाले. ज्यात मला काही जखमा झाल्या. त्यात पुन्हा मी माझ्या वडीलांना बघण्यासाठी जात असतानाच एक मोठा अपघात झाला. परिणामी, माझा हाडाचे दोन तुकडे झाले. त्यांना जोडण्यासाठी स्टीलचा रॉड टाकावा लागला. पण मी  काम  सोडले नाही.

मधुमेहाचा त्रास...
 सहा वषार्पुर्वी मला मधूमेह असल्याचे समजले आणि तेव्हापासूनच इतर आजारही सुरु झाले.  डायबिटीजमुळे पायात खुप दुखतं. स्ट्रेसमुळे  साखरेची लेवल वाढते. डोळ्यांना त्रास होतो. समस्या खूप आहेत. पण हातात पैसे नाहीत. मी आजारी आहे, आई आजारी आहे. मला काम हवंय, मदत हवीयं, असे शगुफ्ता म्हणाली.

 
 

Web Title: actress shagufta ali financial mess no work seeks help for medical treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.