सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराला आलेल्या संभावना सेठच्या पतीला पोलिसांनी मारलं कानाखाली, जाणून घ्या काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 15:16 IST2021-09-04T15:06:53+5:302021-09-04T15:16:36+5:30
सिद्धार्थ शुक्लाच्या शेवटच्या दर्शनासाठी, त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि मनोरंजन विश्वासतले कलाकारामंडळी ओशिवरा स्मशानभूमीत पोहोचले होते.साश्रू नयनांनी सिद्धार्थला निरोप दिला.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराला आलेल्या संभावना सेठच्या पतीला पोलिसांनी मारलं कानाखाली, जाणून घ्या काय घडलं
सिद्धार्थ शुक्ला अंत्यसंस्काराला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थवर ब्रह्माकुमारी विधीनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही प्रकारे कोणाला त्रास होवू नये किंवा काही घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
कलाकारांची प्रचंड गर्दीही होत होती. चाहते आणि मीडिया रिपोर्टसचीही गर्दी जमली होती. सिद्धार्थचे शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी सगळेच गर्दी करत होते. या सगळ्या गोष्टी निटसर व्हाव्यावत कोणतीही घटना घडू नये, गर्दी नियंत्रणात राहावी याची जबाबदारी पोलिंसावर होती. मात्र अंत्यदर्शानाला आलेल्या संभावना सेठ आणि तिचा नवरा अविनाश द्विवेदी यांचा मुंबई पोलिसांसोबत मोठा वाद झाला. मुंबई पोलिसांसह दोघेही वाद घालत आहे याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
संभावना आणि अरविंद स्मशानभूमीत प्रवेश करत असतानाच हा वाद झाला होता. पोलिसांनी आत प्रवेश करताना अरविंदला गेटवर रोखले होते. अरविंद प्रवेश करतेवेळी त्यांच्या मागोमाग काही लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अविनाशलाही थांबवले. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना रोखले होते. मात्र कारण समजण्याआधीच संभावनाचा पोलिसांसोबत बाचाबाची झाली. अरविंदला रोखल्याचे पाहून संभावनाने पोलिसांसह भांडायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांच्यामध्ये धक्काबुक्कीही झाली. संभावनाने पोलिसांवर आरडाओरडाही केला. इतकंच काय तर पोलिसांनी अरविंदवर हातही उगारल्याचे संभावनाने म्हटले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांच्याही यावर प्रतिक्रीया उमटत आहेत. झालेल्या वादाचे नेमकं कारण काय होतं हे समजू शकले नसले तरी, आलेल्या सगळ्या कलाकारांनी पांढरे कपडे घातले होते. अरविंद मात्र फॉर्मेल कपड्यांमध्येच आला होता. त्याच्या हातात मोबाईल पाहून पोलिसांना वाटले की, तो मीडियामधलाच व्यक्ती आहे. पोलिसांचा त्याला ओळखण्यात काही तरी गैरसमज झाल्यामुळे हा वाद झाला असावा अशी शक्यता असल्याचे बोललं जात आहे.