"आमच्या आयुष्यातील नवा अध्याय...", लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचं ठरलं, शेअर केला रोमॅन्टिक व्हिडीओ, होणारा नवरा आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:29 IST2025-12-27T10:27:45+5:302025-12-27T10:29:30+5:30
अखेर दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मधली अभिनेत्री लवकरच करणार लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली...

"आमच्या आयुष्यातील नवा अध्याय...", लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचं ठरलं, शेअर केला रोमॅन्टिक व्हिडीओ, होणारा नवरा आहे तरी कोण?
Marathi Celebrity Wedding: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अलिकडच्या काही दिवसांत मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली, तर काही जणांनी आपल्या प्रेमाची कबुली देत नातं जगजाहीर केलं. ज्ञानदा रामतीर्थकर तसेच गायत्री दातार, रेवती लेले या अभिनेत्रींनी आपल्या नात्याची कबुली देत सोशल मीडियाद्वारे प्रेम व्यक्त केलं. आता या अभिनेत्रींनी पाठोपाठ आणखी एका नायिकेने सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत खास व्हिडीओ पोस्ट करत लवकरच ती लग्न करणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे, जाणून घेऊया...
अभिनेत्री रेवती लेले पाठोपाठ कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत आणखी एक अभिनेत्री बोहोल्यावर चढणार आहे. तिचं नाव साक्षी महाजन आहे. मालिकेत साक्षी विद्या नावाचं पात्र साकारते आहे. सध्या तिची लग्नाची तयारी सुरू झाली आहे. याबद्दल साक्षीने स्वत: खुलासा केला होता. अशातच नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करत तिचा होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सुद्धा दाखवला आहे.
"#साAth...,Our Next Chapter…", असं सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर साक्षी अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्रीने स्वत हा व्हिडीओ शेअर करत बातम्यांना दुजोरा दिला आहे. दोघांच्या लग्नाची ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या दोघेही विविध प्रोजेक्टमध्ये अभिनय करत असून चाहत्यांचं मन जिंकत आहे.
कोण आहे अभिनेता नवरा?
अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली. अथर्व आणि साक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.