रुपाली गांगुलीला लठ्ठपणामुळे करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 19:25 IST2023-03-21T19:22:20+5:302023-03-21T19:25:27+5:30

Rupali ganguly: अनुपमा या नावाने आज घराघरात पोहोचलेली रुपाली आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Actress Rupali Ganguly faced trolling due to her obesity | रुपाली गांगुलीला लठ्ठपणामुळे करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, म्हणाली...

रुपाली गांगुलीला लठ्ठपणामुळे करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, म्हणाली...

रुपाली गांगुली (rupali ganguly) हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. छोट्या पडद्यावर रुपालीने तिचा दबदबा निर्माण केला आहे. अनुपमा या नावाने आज घराघरात पोहोचलेली रुपाली आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मात्र, एकेकाळी तिला  वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागलं होतं. 

 प्रग्नेंन्सी आणि बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांचे वजन खूप वाढते. रुपाली गांगुलीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, पहिला मुलगा रुद्रांशच्या जन्मानंतर तिचं वजन खूप वाढलं होते. या गोष्टीचा तिला काही प्रोब्लेम नव्हता पण शेजाऱ्यांना त्रास होत होता. तिच्या वाढलेल्या वजनाबाबत शेजारी तिला टोमणे मारायचे. अभिनेत्री म्हणाली रुद्रांशचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन ५८ किलो होतो पण त्यानंतर ८६ किलो झालं. रुद्रांशला बाहेर फिरायला घेऊन गेली असताना तिला शेजारी राहणार काकी भेटल्या. ज्याना रुपाली ओळखत देखील नव्हती. त्या तिला म्हणाल्या अरे तू मोनिशा आहेस ना, किती लठ्ठ झाली आहे. एका आईवर बोलण्याचा अधिकार यांना कुणी दिला?, बाई कोणत्या कोणत्या गोष्टीतून जाते हे कोणालाच कळत नाही."

 रूपालीला तुम्ही याआधी साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत पाहिलं असेल. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही.

दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली. रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले.
 

Web Title: Actress Rupali Ganguly faced trolling due to her obesity