बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत झळकणार ये रिश्ता क्या कहलातामधील हा कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 13:33 IST2016-11-14T13:33:29+5:302016-11-14T13:33:29+5:30
मालिकांनी लीप घेण्याचा ट्रेंडच छोट्या पडद्यावर सध्या पाहायला मिळतो. आता बहू हमारी रजनि_कांत ही मालिकादेखील लवकरच काही वर्षांचा लीप ...

बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत झळकणार ये रिश्ता क्या कहलातामधील हा कलाकार
म लिकांनी लीप घेण्याचा ट्रेंडच छोट्या पडद्यावर सध्या पाहायला मिळतो. आता बहू हमारी रजनि_कांत ही मालिकादेखील लवकरच काही वर्षांचा लीप घेणार आहे. ही मालिका फ्रेब्रुवारी महिन्यात पाच वर्षांचा लीप घेणार असल्याची चर्चा आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत यंत्रमानवची भूमिका साकारणाऱ्या रजनीला एक मुलगा असल्याचे लीपनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रजनीमध्ये ज्याप्रकारे अद्भूत शक्ती आहे, त्याचप्रमाणे तिच्या मुलामध्येदेखील असणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध बालकलाकाराची निवड करण्यात आली आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नक्षची भूमिका साकारलेला बालकलाकार शिवांश कोटियन बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत दिसणार आहे. ये रिश्तामध्ये त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. याचसोबत शिवांश कबूल है, बालिकावधू यांसारख्या मालिकेत तर इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातही झळकला होता. बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत शिवांश राम ही भूमिका साकारणार असून तो आपल्या आईप्रमाणे म्हणजेच रजनीप्रमाणे म्हणजेच एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे चालणार, बोलणार आहे. या मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकेत रामची भूमिका ही खूप महत्त्वाची असणार आहे. रामला प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल अाहे. त्यामुळे तो त्या गोष्टींविषयी प्रश्न विचारून समोरच्याला भंडावून सोडतो असे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे हा चिमुकला सगळ्यांना खूप त्रास देणार आहे. शिवांश या मालिकेत प्रेक्षकांना एक मुलगा नव्हे तर यंत्रमानव म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.