अभिनेत्री रसिका सुनील पतीला करतेय खूप मिस, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:11 IST2022-02-03T17:04:53+5:302022-02-03T17:11:37+5:30

रसिका तिचा पती आदित्य बिलागीसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Actress Rasika Sunil misses her husband very much, | अभिनेत्री रसिका सुनील पतीला करतेय खूप मिस, पोस्ट शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री रसिका सुनील पतीला करतेय खूप मिस, पोस्ट शेअर करत म्हणाली...

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही १८ ऑक्टोबर रोजी आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडकली. रसिका तिचा पती आदित्य बिलागीसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ  शेअर करत असते. आता मात्र रसिका Long Distance मध्ये तिच्या नवऱ्याला खूप मिस करतेय. नुकताच रसिकाने एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नवऱ्यासोबतचा गोड फोटो शेअर करत तिने त्यावर,  A cute throwback, just cuz I am missing you... असं कॅप्शन दिलयं. त्यांचा हा क्युट आणि सिंपल फोटो चाहत्यांना खूपच आवडलाय. तसेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही आदित्यसोबत व्हि़डीओ कॉलवर बोलतानाचा फोटो शेअर करत त्यावर आय मिस यू असं देखील लिहिलयं. 

आदित्य हा कामानिमित्त काही दिवसांपूर्वीच परदेशात गेला. यावेळी त्याला सी ऑफ करतानाचा व्हिडीओ देखील रसिकाने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केला होता. 


रसिका ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो आणि रिल्स शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने ब्राईडल लूकमध्ये केलेल्या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. तसेच ती स्वतःचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो नेहमीच शेअर करताना पाहायला मिळते.

Web Title: Actress Rasika Sunil misses her husband very much,