फोटोत दिसणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 07:00 IST2021-05-15T07:00:00+5:302021-05-15T07:00:02+5:30
भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही तिच्या अभिनयाची खासियत आहे.

फोटोत दिसणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी, ओळखा पाहू कोण आहे ती ?
सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आता एका चिमुकलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट आहे. रश्मीने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. रश्मीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही रश्मीच्या अभिनयाची खासियत.
रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. स्वभावाला औषध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती. 'पुढचं पाऊल,' ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले. कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रश्मीचा पती अमित खेडेकर हा देखील अभिनेता आहे. अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
रश्मी सध्या आई माझी काळुबाई मालिकेत आर्याची भूमिका साकारते आहे. आधी ही भूमिका वीणा जगताप साकारत होती. वीणाने ही मालिका हेल्थ इश्यूमुळे सोडली असे या सिरीअलच्या टीमकडून सांगण्यात आलं होते. रश्मी सोशल मीडियाच्या माध्यामातून फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.